आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुख्यात 10 गँगस्टर, जगाच्या Most Wanted लिस्टमध्ये आहे यांचे नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दुबईमधील मालमत्तेवर यूएई सरकारने जप्तीची कारवाई सुरु केली आहे. दाऊद आता देशात राहात नसला तरी त्याची दहशत अजूनही काही शहरांमध्ये आहे. दाऊद प्रमाणेच इतर राज्यातही काही गुंडांची दहशत पाहायला मिळते. राजस्थानमध्ये दहशतीचे दुसरे नाव म्हणून जो कुख्यात आहे तो, गँगस्टर आनंदपाल सिंह नुकताच पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाला आहे. पोलिस व्हॅनवर एके-47 ने गोळीबार करुन फरार झाल्याने तो चर्चेत आला आहे. त्याच्या शोधासाठी राजस्थान पोलिसांनी 100 हून अधिक टीम कामाला लावल्या आहेत. आनंदपाल हा काही भारतातील पहिला वाँटेड गँगस्टर नाही, ही यादी फार मोठी आहे. दाऊद आणि आनंदपालच्या निमीत्ताने divyamarathi.com चर्चा करणार आहे 10 कुख्यात गँगस्टरची.
18 गाड्यांचा ताफा घेऊन चालतो दाऊद इब्राहिम

भारतीय तपास यंत्रणा सीबीआयच्या माहितीनूसार, 26 डिसेंबर 1955 ला महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये दाऊदचा जन्म झाला. त्याचे वडील मुंबई पोलिसमध्ये कॉन्स्टेबल होते. तर, दाऊद गुन्हेगारीकडे वळला. तो नुसताच गुन्हेगार नाही तर इंटरनॅशनल नेटवर्क असलेली 'डी कंपनी' तो चालवतो. देशातील घातपाती कृत्यांमध्येही त्याचे नाव समोर आले होते. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा तो मुख्य आरोपी आहे. सध्या दाऊद पाकिस्तानात दडून बसला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने दाऊदला 18 गाड्यांची सुरक्षा पुरवलेली आहे. त्याच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये जॅमर युक्त आणि बुलेटप्रुफ गाडी देखील आहे. दाऊदच्या दुबईमधील संपत्तीवर तेथील सरकारने टाच आणल्यानंतर आता भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याला तावडीत घेण्याच्या तयारीत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आणखी 9 कुख्यात गँगस्टरबद्दल