(अमेरिकी हवाई दलाची लढाऊ विमाने.)
जगातील सर्वच देशांकडे हवाई दलाची ताकद आहे. लष्कराच्या जोडीला एअरफोर्स असण्याची सुरवात फ्रान्सपासून झाली. तथापी, फ्रान्सपासून सुरवात झाली असली तरी स्वतंत्र हवाई दल म्हणून 1918 मध्ये ब्रिटिश रॉयल फ्लाइंग लष्करी दलाची स्थापना करण्यात आली होती. यानंतर हवाई ताकद सारखे शब्द लष्करी कारवाईत वापरण्यात येऊ लागले. Indian Air Force Day निमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जगातील सर्वांत शक्तिशाली 10 एअरफोर्सबद्दल...
अमेरिकी हवाई दल
अमेरिकी हवाई दलाची स्थापना 11 सप्टेंबर 1947 मध्ये झाली. सध्या अमेरिकेकडे असलेली लढाऊ विमाने आणि जगातील इतर देशांकडे असलेल्या लढाऊ विमानांची संख्या जवळपास सारखी आहे. 2010 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेकडे 5,573 लढाऊ विमाने, 180 मानवरहित विमाने, 2130 क्रूझ मिसाईल आणि 450 आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल आहेत.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, जगातील इतर शक्तिशाली हवाई दलांबद्दल...