आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार: समाजसेवी 100 महिला निवडण्यासाठी देशव्यापी स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- समाजातबदल घडवण्यासाठी योगदान देणाऱ्या 100 समर्पित महिलांची निवड करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय लवकरच राष्ट्रव्यापी स्पर्धा आयोजित करणार आहे. महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन होत अाहे. स्पर्धेसाठी फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. नेटिझन्स या महिलांच्या कार्याचे परीक्षण करून त्यांची निवड करतील.

मनेका गांधी म्हणाल्या की, अशी स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

अशी असेल निवड प्रक्रिया
>ज्या महिलांच्या कार्याने आसपासचे लोक प्रभावित झाले आहेत, अशा महिला या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.
>इच्छुक महिलांना सोशल मीडियावरील त्यांच्या प्रोफाइलवर कमीत कमी पाच हजार कॉमेंट्स मिळवाव्या लागतील. त्यांचे चांगले काम आणि समर्पण यांचा तो पुरावा असेल.
>नेटिझन्सनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारावर अशा 100 समर्पित महिलांची निवड केली जाईल.
>महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे निवड झालेल्या महिलांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले जाईल आणि त्यांना सन्मानाने पुरस्कार प्रदान केला जाईल.

समर्पित महिलांचा गौरव व्हावा
'समाजातबदल घडवण्याच्या कामात योगदान देणाऱ्या समर्पित महिलांच्या कामाचा गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. समाजासाठी काम करणाऱ्या अशा अनेक महिला आहेत. त्यांच्याकडे लक्षच जात नाही.'
-वरिष्ठ अधिकारी, महिला आणि बाल विकास मंत्रालय