आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Bank Defaulters Of India Including Vijay Mallya Ambani Birla By RBI CIBIL

माल्याच नव्हे, अंबानींचे भाऊजी, अदाणींचे व्याही, बिर्लांचा मेहुणा, बिगबीचे बंधूही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रिलायन्स उद्योग समुहाचे मालकमुकेश अंबानी यांचे भाऊजी... गुजराती बिझनेसमन गौतम अदाणी यांचे व्याही... बिर्ला समुहाचे चेअरमन कुमार मंगलम यांचा मेहुणा... बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचे धाकटे बंधू... मोदी सरकारमधील मंत्री... हे सर्व व्हीव्हीआयपी असून समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. मात्र, यासह आणखी एक विशेषक त्यांच्यासोबत जुळले आहे. ते म्हणजे 'विलफुल डिफॉल्टर्स'. अर्थात थकबाकी देण्याची कुवत असतानाही जाणून बुजून कर्ज न चुकवणारे.

वरील मंडळी देशातील विविध बॅंकांचे कर्जदार आहेत. त्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. मात्र, आतापर्यंत चुकवले नाही. याप्रकरणी आम्ही 10 डिफॉल्टर्स व कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. केवळ डिफॉल्टर्सनी प्रतिसाद ‍दिला. इतरांना ईमेल, फोन करूनही त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही.

काय मोदीजी, सरकारी कंपनी देखील डिफॉल्टर
मोदी सरकारच्या कृषि मंत्रालया अंतर्गत येणारी 'नाफेड' कंपनी देखील डिफॉल्टर आहे. कंपनीने बॅंकांकडून घेतलेले कर्ज अद्याप चुकते केले नाही. पीएनबी व स्टेट बॅंक ऑफ बिकानेर-जयपूरने नाफेड कंपनीला विलफुल डिफॉल्टर घोषित केले आहे. पीएनबीचे कंपनीकडे 225 कोटी रुपये थकबाकी आहे.

बॅंकांकडून कोट्यवधींचे कर्ज घेऊन ते न चुकवणार्‍या VVIP's ची लांबलचक यादी आहे. देशात 18,176 लोक/कंपन्या अशा आहेत, की त्यांना बॅंकांनी विलफुल डिफॉल्टर घोषित केले आहे. सगळ्यांकडे जवळपास 2 लाख 35 हजार कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा कोल ब्लॉक स्कॅम (जवळपास 1.86 लाख कोटी) व 2 जी स्कॅम (जवळपास 1.76 लाख कोटी) पेक्षाही जास्त आहे. यादीतील प्रत्येकाकडे 25 लाख ते एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. ही माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेड (सिबिल) ने जाहीर केली आहे.

सगळ्यांना फरार होण्याची संधी देत आहे सरकार?
देशातील बॅंकांना 9 हजार कोटी रुपयांना चूना लावून लंडनमध्ये पळून गेलेले मद्यसम्राट विजय माल्यांवर सध्या फोकस आहे. बॅंका, कोर्ट व चौकशी एजन्सी याप्रकरणी तपास करत आहेत. मात्र, देशातील इतर कर्जदारांवर कारवाई कधी? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या मंडळींवर सरकारचा वरदहस्त तर नाही ना? सगळ्यांना फरार होण्याची सरकार संधी तर देत नाही ना अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

आश्चर्याकारक गोष्ट म्हणजे, 500 कोटी + च्या डिफॉल्टर्सची यादी RBI ने बंद लिफाफ्यात सुप्रीम कोर्टात सादर केली आहे. मात्र, त्यावरही अद्याप कार्यवाही झालेली दिसत नाही.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, कोण आहेत हे VVIP विलपुल डिफॉल्टर्स...