आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Top Home Official Tried To Stall Arrest Matang Singh, Accused In Saradha Chit Fund Scam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गृहसचिव गोस्वामींना केंद्राचा बाहेरचा रस्ता, भ्रष्ट काँग्रेस नेत्याला वाचवण्याचा केला होता प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारने केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांचा बुधवारी रात्री राजीनामा घेऊन बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांनी शारदा घोटाळ्यातील माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते मतंग सिंग यांची अटक टाळण्यासाठी सीबीआय अधिकाऱ्यांना फोन केला होता.

शारदा घोटाळ्यात मतंग सिंग यांना ३१ जानेवारी रोजी कोलकात्यात अटक झाली होती. या प्रकरणाशी गोस्वामींचा संबंध असल्याची गरमागरम चर्चा बुधवारी मंत्रालयात सुरू होती. प्रकरण मीडियात आल्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी अनिल गोस्वामी आणि सीबीआय संचालक अनिल सिंग या दोघांनाही बोलावून चर्चा केली. त्यात सीबीआय अधिकाऱ्यांना आपण फोन केल्याचे गोस्वामी यांनी मान्य केले.

त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाला अहवाल पाठवण्यात आला. सायंकाळी राजनाथसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तपशील सांगितला. रात्री उशीरा पीएमओने गाेस्वामी यांना राजीनामा देण्यास सांगितले. मात्र गोस्वामींनी तत्काळ प्रभावाने स्वेच्छानिवृत्तीची विनंती केली. केंद्र सरकारने ती मान्य केली. तसे पाहता गोस्वामी यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. ते जम्मू काश्मीर कॅडरचे १९७८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. यापूर्वी परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनाही २८ जानेवारी रोजी अशाच पद्धतीने पदावरून दूर करण्यात आले होते.

एल.सी. गोयल यांची गृहसचिवपदी नियुक्ती
केंद्रीय ग्रामविकास सचिव एल.सी. गोयल यांनी नवीन केंद्रीय गृहसचिवपदी नियुक्ती झाली आहे. ते केरळ कॅडरच्या १९७९ बॅचचे आयएस अधिकारी आहेत. दुसरीकडे, तत्कालीन गृह सचिव आर. के. सिंह यांचा कार्यकाळ संपण्याच्या दोन महिने आधीच गोस्वामींची नियुक्ती झाली होती. त्यावेळी पी.के. मिश्रा व डीआरएस चौधरींना हे पद मिळण्याची चर्चा होती परंतु गुलाम नबी आझाद यांचे विश्वासू गोस्वामी यांना संधी मिळाली.

सरकारने संधी साधली
केंद्रात सत्तापरिवर्तन होताच गोस्वामी यांच्या हकालपट्टीची चर्चा सुरू होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधीच गोस्वामी त्यांना भेटूनही आले होते. परंतु गोस्वामींना विनाकारण हटवले तर नोकरशाहीमध्ये चुकीचा संदेश जाण्याची भीती होती. आता सीबीआयनेच त्यांच्याकडे बोट दाखवल्यामुळे सरकारने संधी साधून घेतली.