आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल- डिझेल खरेदी कार्डवर केल्यास पूर्ण रक्कम कपात होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डेबिट/ क्रेडिट कार्ड किंवा ई-पेमेंटद्वारे पेट्रोल-डिझेल खरेदी केल्यास सरकारने घोषित केलेली ०.७५ टक्के सूट सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाली. मात्र खरेदीवेळी ग्राहकांकडून पूर्ण रक्कम वसूल केली जाईल. सवलतीची रक्कम कॅशबॅकच्या स्वरूपात ग्राहकाने ज्या खात्यातून पेमेंट केले त्याच खात्यात नंतर जमा होईल, असे इंडियन ऑइलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ही रक्कम ग्राहकांच्या संबंधित खात्यात जमा होण्यासाठी जास्तीत जास्त तीन दिवस लागतील.

पाच वर्षांत बंद होईल २००० ची नवीन नोट : आरएसएसचे आर्थिक विचारवंत एस. गुरुमूर्ती यांच्या मते, २००० रुपयांची नवीन नोट पुढच्या पाच वर्षांत बंद होईल. नोटबंदीमुळे रोकड रकमेचा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने ही नोट छापण्याचा निर्णय घेतला. परंतु पुढील पाच वर्षांत ती बंद केली जाईल. भविष्यात ५०० रुपयांची नोटच सर्वात मोठे
चलन असेल.
बातम्या आणखी आहेत...