नवी दिल्ली- गेल्या सात वर्षांत केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) एकूण २२८ जवानांनी आत्महत्या केल्या असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
या बहुतांश आत्महत्या तणावातूनच झाल्याचे स्पष्ट होत असल्याने सरकारने सर्व निमलष्करी दलांना आता योग करणे बंधनकारक केले आहे. अनेक प्रकरणांमध्ये वैवाहिक ताटातूट, वैयक्तिक शत्रुत्व, वैफल्य, वैयक्तिक किंवा घरगुती वाद, मानसिक आजार ही आत्महत्या करण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट होत आहे. यातच कामाचा ताण हेदेखील काही प्रकरणांमध्ये प्रमुख कारण असल्याचेअसे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले.