आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tow Reserve Battalions In Maharashtrafor The Nakshalist

महाराष्ट्रात दाेन राखीव बटालियन, नक्षलवादाच्या बीमाेडासाठी पाच राज्यांत १७ बटालियन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नक्षलवादाचा सामना करण्यासाठी पाच राज्यांमधे १७ भारतीय राखीव बटालियन उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यात महाराष्ट्रातील दोन भारतीय राखीव बटालियनचा समावेश आहे.
या निर्णयानुसार महाराष्ट्रात २, ओडिशात ३, झारखंडमध्ये ३, छत्तीसगडमध्ये चार, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच बटालियन उभारण्यात येणार अाहेत.

महाराष्ट्रातील गडचिराेली, गाेंिदया या नक्षलग्रस्त भागात स्थापन करण्यात येणाऱ्या बटालियनमध्ये स्थानिक युवकांची भरती करण्यात येणार आहे. साधारणपणे एका बटालियनमध्ये ३०० ते ८०० जवानांचा समावेश केला जातो. यामुळे लष्कर किंवा पोलिस दलात संधीच्या शोधात असलेल्या युवकांना लाभ होणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील या दलात काॅन्स्टेबलच्या रिक्त असलेल्या ७५ टक्के जागा भरण्यात येतील.

चतुर्थश्रेणी पदासाठी आवश्यकतेनुसार राज्य सरकार शिक्षण वयोमर्यादेत सवलत देऊ शकते. देशात १९७१ पासून भारतीय राखीव बटालियन पद्धत सुरू करण्यात आली. त्यानुसार विविध राज्यांमध्ये १५३ बटालियन उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी १४४ बटालियन आतापर्यंत स्थापन करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पाच बटालियन स्थापन करण्यात येणार आहेत. येत असून तिथे काॅन्स्टेबल आणि चतुर्थ श्रेणी पदांसाठी ६० टक्के जागा या सीमावर्ती भागातून भरण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात अाला. झारखंड येथील एका बटालियनला विशेष भारतीय रिझर्व बटालियन (एसअायअारबी) मध्ये परिवर्तीत करण्यात अाले अाहे. त्यात दाेन अभियांत्रिकी अाणि पाच सुरक्षा कंपन्यांचा समावेश अाहे.