चिमुकल्यांना घेऊन तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये जाता. त्यांना टॉय ट्रेन, टॉय कार, टॉय बस आदी वाहनांमध्ये बसवता. यावेळी त्यांना एका अनोळखी व्यक्तीकडे सोपवता. ही अनोळखी व्यक्ती तुमच्या चिमुकल्यासोबत काय करु शकते हे या व्हिडिओत कॅप्चर झाले आहे. टॉय कार ऑपरेटरने संधी बघून या चिमुकल्याचे लैंगिक शोषण केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना कोणत्या शहरात घडली. कोणत्या शॉपिंग मॉलमधील आहे, याची माहिती मात्र मिळालेली नाही.
व्हिडिओत काय आहे
एक चिमुकला टॉय कारमध्ये बसलेला आहे. टॉय कार ऑपरेटर या चिमुकल्याला घेऊन शॉपिंग मॉलमधील कोपऱ्यात जातो. कुणी आपल्याला बघत नाही याची खात्री करुन चिमुकल्याला वारंवार किस करतो. चिमुकला याचा विरोध करतो. पण तरीही ऑपरेटर किस करीत राहतो.
'द लॉजिकल इंडियन' या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ दिशा शर्मा नावाच्या तरुणीने अपलोड केला आहे. शॉपिंग मॉलमध्ये चिमुकल्यांसोबत कशा दुर्घटना घडू शकतात हे दाखविण्यासाठी हा व्हिडिओ अपलोड केला असल्याचे तिने सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर छायाचित्रांमध्ये बघा, टॉय कार ऑपरेटर कसा किस करतोय चिमुकल्याला....