आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: वाहतूक पोलिसाने महिलेच्या पाठीत मारली वीट, प्रथम निलंबित, नंतर झाली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वाहतूक विभागाच्या पोलिस हवालदाराने महिलेच्या पाठीत वीट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, हे प्रकरण चांगलेच तापत असल्याचे बघून या हवालदाराला प्रारंभी निलंबित करण्यात आले. परंतु, या महिलेने आता पोलिस तक्रार दिली असल्याने त्याला अटकही करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी जाहीर माफी मागितली आहे. या महिलेला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडिओ तयार करणारे कमलकांत यांनी सांगितले, की महिलेने वाहतूक पोलिसाला पैसे दिले नाही. त्यानंतर पोलिसाने तिला मारहाण करण्यास सुरवात केली.
यावर दिल्ली राज्य सरकारचे गृहमंत्री सतेंद्र जैन यांनी सांगितले, की आम्ही या प्रकरणाची चौकशी करीत आहोत. आम्ही जे काही करु शकतो ते करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. दरम्यान, यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी माफी मागावी, असे दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी म्हटले आहे.
महिलेची आपबिती
या महिलेेचे नाव रमनजीत कौर असे आहे. याबाबत रमनजीत यांनी सांगितले, की माझ्या तीन मुलांसह मी स्कूटीवरुन शाळेतून घरी येत होते. मथुरा रोडवर पोलिस हवालदार सतीश चंद यांनी मला थांबविले. तुम्ही सिग्नल तोडला आहे, असे सांगितले. पण मी सिग्नस तोडलेला नव्हता.
200 रुपये मागितले
जर सिग्नल तोडला असेल तर मी माफी मागते असे मी पोलिसाला सांगितले. त्यानंतर पोलिसाने म्हटले, की तो माझे चालान कापेल. त्यानंतर त्याने गाडीची कागदपत्रे मागितली. मी ती दिली. त्यानंतर त्याने 200 रुपये मागितले. मी चालानाची पावती मागितली. तेव्हा त्याने ती देण्यास नकार दिला. तो म्हणाला, 200 रुपये द्या आणि जा. मी सांगितले, की तुम्ही माझ्या घरी चालानाची पावती पाठवा.
पोलिसाने माझा हात धरला
महिलेने आरोप लावला आहे, की माझ्या शब्दांनी तो नाराज झाला. तो मला आणि माझ्या मुलीला शिव्या देऊ लागला. त्याने माझा हात धरला. मला मारले. माझ्या स्कूटरचे नुकसान केले. माझ्या पाठीवर वीट फेकून मारली. यावेळी माझ्या मुलीने 100 क्रमांकावर फोन केला.
महिलेने फेकला दगड
व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येते, की या महिलेने पोलिसाच्या बाईकवर दगड फेकला. त्यानंतर पोलिसाने महिलेच्या पाठिवर वीट फेकली. यावर महिला म्हणाली, की बचावासाठी मी त्याच्या बाईकवर दगड फेकला होता.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ....महिलेच्या पाठीत पोलिसाने कशी मारली वीट....