आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Traffic Rules Violated By 2 Modi Sarkar Ministers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक पर्यावरण दिवस: संदेश देण्याच्या नादात मंत्री महोदयांनी नियम मोडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त आयोजित वाहन रॅलीत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवत विना हेल्मेट स्कुटर चालवली. प्रदुषण टाळण्याचा संदेश देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे लक्षात घेत वाहतूक पोलिसांनीही दुर्लक्ष केले. जावडेकरांच्या मागे शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनंद गिते बसलेले होते. ते देखील विना हेल्मेट वाहन रॅलीत सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्र्यांनी ज्या स्कुटरने प्रवास केला ती एन्व्हायरमेंटल फ्रेंडली होती.
मोदी सरकारमधील मंत्र्यांनी वाहतूकीचे नियम मोडण्याची ही पहिली घटना नाही. याआदी खुद्द केंद्रीय पर्यावहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या गृह जिल्ह्यात - नागपूरमध्ये विना हेल्मेट स्कुटर चालवली होती. तेव्हा विरोधीपक्षांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.