आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिद्वार एक्स्प्रेसला भिडली टिळक एक्स्प्रेस; चालक ठार, 100 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणातील पलवल येथे झालेल्या दुर्घटनेचा हे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर झाले आहे. - Divya Marathi
हरियाणातील पलवल येथे झालेल्या दुर्घटनेचा हे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर झाले आहे.
फरीदाबाद/पलवल - हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात मंगळवारी सकाळी दोन रेल्वेची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत एका रेल्वेच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. यात 100 लोक जखमी झाले आहे.

केव्हा झाली दुर्घटना
- मंगळवारी सकाळी लोकमान्य टिळक-हरिद्वार एक्स्प्रेस दिल्लीकडे जात होती तेव्हा पलवल आणि असावटी स्टेशनदरम्यान मागून येणाऱ्या ईएमयू शटल यांच्यात टक्कर झाली.
-या दुर्घटनेत एक्स्प्रेसचा चालक ठार झाला आहे. तर 100 प्रवासी जखमी झाले आहेत.
- दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासान तातडीने कामाला लागले. घटनास्थळी मदत पथक रवाना करण्यात आले. त्यानंतर रेल्वे ट्रॅकवर मदतकार्य सुरु करण्यात आले.

UPDATES
- रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही दुर्घटना मंगळवारी सकाळी 8.25 वाजता घडली. लोकमान्य टिळक एक्स्प्रेस आणि ईएमयू एकाच ट्रॅकवर चालल्या होत्या.
- हरियाणातील बाघोला गावाजवळ ईएमयू शटलने लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला मागून टक्कर मारली. दोन्ही रेल्वे दिल्लीच्या दिशेने जात होत्या.
- दुर्घटनेत लोकमान्य टिळक एक्स्प्रेसच्या चालकाचा मृत्यू झाला आणि ईएमयू शटलचा चालक आणि गार्ड गंभीर जखमी आहे.
- मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पलवलच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.
पुढील स्लाइडमध्ये, मृत्यू बनून आली रेल्वे, बोलेरोला चिकटले होते मृतदेह....
बातम्या आणखी आहेत...