आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षापासून 139 वर कॉल करुन रद्द करता येईल रेल्वे तिकिट, काऊंटरवरुन मिळणार पैसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्हाला प्रवासाच्या थोडावेळ आधी रेल्वे तिकिट रद्द करायचे आहे आणि तिकिटाची निम्मी रक्कम कपातीची चिंता सातावते आहे, तर तुमची ही समस्या लवकर संपुष्टात येणार आहे. तुम्ही तुमचे कन्फर्म तिकिट चौकशी हेल्पलाइन क्रमांक 139 वर फोन करुनही रद्द करु शकता आणि नंतर तिकिट खिडकीवरुन तुमचे पैसे मिळवू शकता. ही सुविधा नव्यावर्षात प्रजासत्ताक दिनापासून (26 जानेवारी) लागू होणार आहे.

आतापर्यंत काय होत होते
- आतापर्यंत प्रवास सुरु होण्याच्या थोडावेळ आधी तिकिट रद्द करण्यासाठी रेल्वेस्टेशनवर पोहोचणे गरजे होते.
- असे केले नाही तर तिकिटाचे निम्मे पैसे कापले जात होते.
- नवीन वर्षात तिकिट रद्द करण्यासाठी नवीन अॅप्लिकेशन सुरु केले जाणार आहे.
- तुम्ही 139 वर कॉल करुन तिकिट रद्द करु शकाल.
- तिकिट रद्द करण्यासाठी तुम्ही कॉल केल्यानंतर तिकिट बुक करताना तुम्ही दिलेला मोबाइल क्रमांक विचारला जाईल.
- त्यानंतर मोबाइलवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) पाठवला जाईल.
- चौकशी अधिकाऱ्याला ओटीपी क्रमांक सांगावा लागेल.
- त्यानंतर तिकिट रद्द होईल.
- यानंतर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या तिकिट काऊंटरवर तिकिट दाखवून उर्वरित रक्कम घेऊ शकता.

पुढील स्लाइडवर पाहा, किती कापले जातात पैसे
बातम्या आणखी आहेत...