आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Capitals Cripple Due To Dense Fog And Smog

दाट धुक्याने उत्तर भारतातील 169 ट्रेन उशिरा, 33 उड्डाणांवर परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दाट धुके आणि थंडीच्या लाटेचा उत्तर भारतातील दळणवळणावर विपरित परिणाम झाला आहे. रस्त्यावरील वाहतूक धिम्या गतीने सुरु असून तब्बल 169 ट्रेन उशीराने धावत आहेत. दिल्ली विमानतळावरही दाट धुके असल्याने 33 उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (सोमवार) सकाळी 6 पर्यंत वातावरणातील दृष्यता केवळ 0 होती. त्याचा आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला. वातावरणातील बदलामुळे 33 उड्डाणांच्या प्रवाशांना असुविधेला सामोरे जावे लागले. त्यातील 21 उड्डाणे विलंबाने करण्यात आली.
दिल्लीत कालही (रविवार) अशीच परिस्थिती होती. वातावरणातील दृष्यता 200 मीटरपेक्षा कमी होती. त्यामुळे 91 ट्रेन आणि 60 उड्डाणांवर विपरित परिणाम झाला.
दृष्यतेत कमालिची घट झाली असल्याने 21 उड्डाणे विलंबाने करण्यात आली असून 12 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, असे इंदिरा गांधी आंतररराष्ट्रीय विमानतळाने सांगितले आहे.
उशीराने धावणाऱ्या ट्रेनची माहिती मिळवा खालिल लिंकवर...
http://enquiry.indianrail.gov.in/ntes/
उत्तरेतील विमानतळांच्या वातावरणाची माहिती मिळवा खालिल लिंकवर...
http://www.skymetweather.com/forecast/fog-update-in-india
दिल्ली विमानतळावरील उड्डाणांची माहिती मिळवा खालिल लिंकवर...
http://www.newdelhiairport.in/liveflight-information.aspx?smode=A
दिल्लीतील दाट धुक्याचे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...