आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trains Halted And Some Delayed At Delhi Railway Station After Bomb Scare

शताब्दी एक्‍स्‍प्रेसमध्‍ये बॉम्‍ब ठेवल्‍याची धमकी, गाडी थांबवली, केली तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तपासणी करताना पोलिस. - Divya Marathi
तपासणी करताना पोलिस.
नवी दिल्ली - शताब्दी एक्‍स्‍प्रेसमध्‍ये बॉम्‍ब ठेवल्‍याच्‍या धमकीचा ई-मेल मिळल्‍याने गाझियाबाद येथे सकाळी 7 वाजता ट्रेन थांबवण्‍यात आली. शिवाय गाडीतून सर्व प्रवाशांना उतरवून सुरक्षा पथकांनी दोन तास ट्रेनची आणि प्रत्‍येक प्रवाशाची तपासणी केली. त्‍यानंतर नऊ वाजता ही ट्रेन लखनौकडे रवाना झाली.

कशी मिळाली धमकी
- दिल्‍ली- कानपूर शताब्‍दी एक्‍स्‍प्रेसमध्‍ये बॉम्‍ब ठेवल्‍याचा ई-मेल रेल्‍वे बोर्डाला मिळाला होता. याची माहिती बोर्डाकडून मुंबई एटीएसला देण्‍यात आली.
------------
- एएनआय या वृत्‍तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनुसार दिल्ली-कानपूर शताब्दी एक्‍स्‍प्रेसमध्‍ये बॉम्‍ब ठेवल्‍याची माहिती मिळताच गाजियाबाद रेल्‍वे स्‍टेशनजवळ गाडीला थांबवण्‍यात आले.
------------
- एएसआयने मुख्‍य स्‍थानक व्‍यवस्‍थापक यांना पत्र देऊन ट्रेन थांबवण्‍याची विनंती केली होती.
- या शिवाय नवी दिल्‍लीतून सुटलेल्‍या अनेक गाड्यांना थांबवण्‍यात आले आहे.
------------
- पठाणकोट हल्‍ल्‍यानंतर सर्व सुरक्षा संस्‍था अलर्ट झाल्‍या आहेत.
का घेण्‍यात आली खरबदारी ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अनपेक्षित मित्रभेटीनंतर खवळलेल्या पाकिस्तानमधील अतिरेकी गटांनी पठाणकोट येथील वायुदलाच्या तळावर नियोजनबद्ध हल्ला केला. त्‍यामुळे संपूर्ण देशात हाय अर्लट जाहीर करण्‍यात आला असून, कडक बंदोबस्‍त आहे. त्‍यामुळे सुरक्षा यंत्रणेने ही धमकी गांभीर्याने घेतली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...