आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही स्टायलिश ट्रान्सजेंडर आहे BJP लीडर, ऑस्ट्रेलियातून घेतलंय शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात ट्रान्सजेंडर्सचे आयुष्य बदलत असले तरी त्यांच्याकडे पाहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही. अप्सरा रेड्डी हिचा जन्म मुलाच्या रुपात झाला होता. मात्र, त्याने लिंग बदलून तो मुलगी बनला. जगातील मोठ्या न्यूजपेपर्समध्ये काम केल्यानंतर अप्सराने राजकारणात पदार्पण केले. भाजपमध्ये प्रवेश केला.

कुठे केलं शिक्षण व जॉब...
- अप्सराने माध्यमिक शिक्षण तामिळनाडूतील चेन्नईतून केले.
- नंतर तिने ऑस्ट्रेलियातील मोनाश यूनिव्हर्सिटीतून जर्नलिझममध्ये पदवी घेतली.
- अप्सराने लंडनमधील सिटी यूनिव्हर्सिटीतून ब्रॉडकास्टिंगमध्ये पदवीत्तर पदवी घेतली.
- अप्सराने यूनिसेफ जॉइन करून संपूर्ण तामिळनाडूमध्ये हेल्थ कॅम्पेन लॉन्च केले.
- नंतर बीबीसी व कॉमनवेल्थ सेक्रिटेरिएटशिवाय भारतातील अनेक मोठ्या न्यूजपेपरध्ये काम केले.
- यासोबतच वुमन्स एम्पावरमेंट, करप्शन व महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला.
- जागतिक महिला दिनी अप्सराने भाजपमध्ये प्रवेश केला व आता ती पक्षाची स्पोकपर्सन बनली आहे.

अप्सराच्या आयुष्यात 'कभी खुशी कभी गम'
- अप्सराने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, बीबीसीमध्ये काम करताना ती जगातील अनेक स्टार्सला भेटली. हा तिच्या आयुष्यातील सर्वात सुखद अनुभव राहिला.
- अमेरीकन अॅक्टर व प्रोड्यूसर निकोलास केजच्या इंटरव्ह्यूचाही तिला चांगला अनुभव आला.
- अप्सराने सांगितले की, मायकल शूमाकरसोबत ग्रँड प्रिक्स दौर्‍यावर जाने व त्यांच्याविषयी भारतीय इंग्रजी वृत्तपत्रात लिखाण करणे हे तिच्या आयुष्यातील प्राउड मोमेंट होती.
- सेक्स चेंज केल्यानंतर मात्र समाजाचा तिच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन पार बदलला. पण अप्सराने कोणावरही तिने आरोपप्रत्यारोप केले नाहीत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्टाइलिश ट्रान्सजेंडर BJP नेत्या अप्सरा रेड्डीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...