आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Travel Across India Under Bharat Darshan Scheme By Indian Railway

भारत दर्शन योजने अंतर्गत रेल्वेबरोबर देशभ्रमण करा 500 रूपयांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रोज अवघ्या 500 रुपयांत तीर्थाटनाची योजना रेल्वेने पुन्हा एकदा आणली आहे. यात यात्रेकरूंना रेल्वे-बसचे कन्फर्म तिकीट, रोजचे जेवण, पर्यटनाची व्यवस्था, मुक्कामासाठी धर्मशाळा, स्थळांची माहिती देणार्‍या गाइडच्या सुविधेसह सुरक्षा क्षकही दिमतीला असणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीने भारत दर्शन योजनेंतर्गत ही ऑफर दिली आहे.

योजनेची पहिली रेल्वेगाडी 23 ऑक्टोबर रोजी दिल्लीहून, तर दुसरी गाडी 11 नोव्हेंबरला चंदिगडहून जयपूरमार्गे रवाना होत आहे. आयआरसीटीसीचे उत्तर विभागीय समूह महाव्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी सांगितले की, दिल्ली सफदरजंग रेल्वेस्थानकातून निघणार्‍या पहिल्या गाडीत आग्रा, ग्वाल्हेर, झाशी, भोपाळचे प्रवासी सहभागी होऊ शकतात. यात्रेकरूंना शिर्डीच्या साईबाबांसह शनिशिंगणापूरचेही दर्शन घडवले जाईल. 27 ऑक्टोबरला गाडी दिल्लीत परतेल.