नवी दिल्ली - ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सर्व बँकांत कामकाज पुन्हा सुरू झाले, परंतु सकाळपासूनच गोंधळाची स्थिती राहिली. सर्व बँकांत लोकांची गर्दी झाली होती. याचदरम्यान लोकांनी जेथे जुन्या नोटा चालवता येऊ शकतील असे मार्गही धुंडाळले. परिणामी रेल्वे आरक्षण व विमान बुकिंगसाठी तोबा गर्दी झाली. त्यामुळे १० हजार रुपयांपेक्षा जास्तीची तिकिटे रद्द केल्यास रोख रकमेत रिफंड मिळणार नाही, रक्कम बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल, असे रेल्वेला जाहीर करावे लागले. पश्चिम रेल्वेने एसी प्रथम व द्वितीय श्रेणीच्या वेटिंग तिकिटांवर बंदी घातली. मात्र दीड तासातच निर्णय मागे घेतला. विमानाचे रोखीने बुकिंग चारपट वाढले. जुन्या नोटांवर तिकीट बुकिंग करणाऱ्यांना रोखीने रिफंड देऊ नये, असे आदेश दिले. दरम्यान, अनेक शहरांत प्राप्तिकर विभागाने छापे मारले.
मद्रास हायकोर्ट म्हणाले, हा देशहिताचा चांगला निर्णय
मद्रास हायकोर्टाने नोटबंदीविरुद्धच्या याचिका फेटाळताना हा देशहिताचा निर्णय आहे. देशाची सुरक्षा व विकासासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
बँकेत जाताना अायडीची झेराॅक्स प्रत सोबत न्या
डी.के.सिंह, शाखा व्यवस्थापक, एसबीआय
५०० व १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर पहिल्यांदा बँक उघडल्यानंतर सर्वत्र गोंधळाची स्थिती होती. मात्र, आपण ही स्थिती टाळू शकतो. नोटा बदलण्यासाठी व जुन्या नोटा जमा करण्यासाठी सरकारने आपल्याला ५० दिवस म्हणजे ३० डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तुम्हाला पैशाची त्वरित निकड असल्यासच बँकेत जा, अन्यथा टाळा. नोटा परत बदलून मिळतील की नाही या भीतीपोटी बँकेत जाण्याची घाई करू नका. तुम्ही रक्कम पूर्ण सुरक्षित आहे आणि तुम्ही ती कधीही आणि कोठेही बदलू शकता. अथवा खात्यातून १० हजार रुपयांपर्यंत काढू शकता. बँकेत नोटा बदलण्याच्या प्रक्रियेत काहीही बदल झालेला नाही. नोट बदलण्यासाठी बँकेतील एक फॉर्म भरावा लागेल. यासोबत तुमचा ओरिजनल फोटो आयडी व त्याची सत्यप्रत सोबत घेऊन या. याचा पुन्हा दुरुपयोग होऊ नये यासाठी सत्यप्रतीवर तारीख व रक्कम लिहिली जाईल. येत्या काही दिवसांत नव्या नोटा उपलब्ध झाल्यावर स्थिती सामान्य होऊ लागेल.
भास्कर गाइड- ५००/ १००० च्या जुन्या नोटा बदलण्याशी संबंधित प्रश्न कायम आहेत. ‘भास्कर’ने सीए अखिलेश तिवारी, आयकरतज्ज्ञ राजेश्वर दयाल, अलाहाबाद बँकेचे निवृत्त व्यवस्थापक बी.के. भटनागर व कर प्रकरणांचे वकील राकेश श्रोती यांच्याशी चर्चा करून प्रश्नांची उत्तरे शोधली...
पुढील स्लाईडवर वाचा, काय आहेत तुमचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे...