आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल अर्थवर पाहा आपण लावलेला वृक्ष, कोलकत्यातील पर्यावरण प्रेमींची योजना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - गुगल अर्थच्या माध्यमातून आपण जगात कुठेही गेलो तरी आपले घर पाहू शकतो. त्या घराच्या लोकेशनवर आपले नावही टाकू शकतो. याच पद्धतीने आता देशातील काही झाडे आपल्याला दत्तक घेता येतील. गुगल अर्थवर या झाडांच्या लोकेशनवर आपली नावेही झळकू शकतात. कोलकात्यातील काही पर्यावरणप्रेमी उद्योजकांनी एनजीओच्या सहकार्यातून राष्ट्रीय पातळीवर एक योजना सुरू केली आहे. जागतिक तापमानवाढीला प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच दारिद्रय़रेषेखालील शेतकर्‍यांच्या रोजीरोटीसाठी हातभार लावणे या योजनेमागील हेतू आहे.

सस्टेनेबल ग्रिन इनिशिएटिव्ह (एसजीआय) या कोलकात्यातील संस्थेमार्फ त ही योजना राबवली जात आहे. देशातील काही एनजीओ, महिला मंडळ, वन मंडळ आणि स्वयंसेवकांना फळझाडे लावण्याची तसेच त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे झाड दत्तक घेणार्‍यास लागवडीचा तसेच त्याच्या संगोपनासाठीचा खर्च द्यावा लागेल. योजनेअंतर्गत फळझाडे लावण्यात येणार असून भविष्यात झाडाला आलेली फळे शेतकर्‍यांकडून विकत घ्यावी लागणार आहेत.


दत्तक घेणार्‍यास ‘ई सर्टिफिकेट’
झाड दत्तक घेणार्‍यास एसजीआयमार्फत ई सर्टिफिकेट दिले जाईल. म्हणजेच गुगल अर्थवर आपण नियोजित लोकेशनवर गेल्यास तेथे दत्तक घेणार्‍याचे छायाचित्र, नाव व संपूर्ण पत्ता दिसेल. तसेच या झाडासंबंधीची अक्षांश-रेखांशाची माहितीही दिसेल. त्यामुळे आपण गुगल अर्थच्या मदतीने आपण कुठेही बसून आपल्या मित्रांना किंवा नातेवाइकांना ‘माझा वृक्ष’ दाखवू शकतो. ही सर्व माहिती कोणत्याही एक्झिफ मॅपवरही पाहता येऊ शकते.