आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसद ठप्प! विराेधी पक्षांचे 200 खासदार उतरले रस्त्यावर, 28 नोव्हेंबरला आक्रोश दिन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीविरुद्ध बुधवारी दिवसभर राजकारण तापलेलेच राहिले. १२ विरोधी पक्षांच्या २०० खासदारांनी संसद परिसरात मानवी साखळी धरून निषेध आंदोलन केले. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जंतर-मंतरवर धरणे दिली. नोटबंदीला विरोध दर्शवण्यासाठी विरोधकांनी २८ नोव्हेंबरला आक्रोश दिन पाळण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, सरकारने संसदेतील कोंडी फोडण्यासाठी चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. लोकसभेत नियम १५६ अंतर्गत चर्चा करा, नोटबंदीवरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी उपस्थित राहवे आणि नोटबंदीची माहिती फुटल्याच्या आरोपाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा, अशा विरोधकांच्या मागण्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यामुळे विरोधकांनी मागील पाच दिवसांपासून संसदेचे कामकाज ठप्प केले आहे.

मोदींनी देशाचे बारा वाजवले : ममता
जंतर-मंतरवर धरणे आंदोलनादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मोदींनी देशाचे १२ वाजवले आहेत. स्विस बँकेत खाती असलेल्यांना लक्ष्य करण्याऐवजी त्यांनी सामान्य माणसालाच लक्ष्य केले आहे. ३० डिसेंबरनंतर दाखवण्याची भाषा करत आहेत, मात्र जनता त्यांना आताच दाखवून देईल.

निर्णय मागे घेणे मोदींच्या रक्तात नाही : नायडू
नोटबंदीचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेतला जाणार नाही. निर्णय मागे घेणे मोदींच्या रक्तात नाही. मोदींना विरोध आणि त्यांच्यावर आरोप करणे ही आजकाल फॅशन झाली आहे, असे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले.

पुढील स्लाईडवर वाचा...संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचा वेळ गेला वाया...
बातम्या आणखी आहेत...