आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तलाकवर कुराण-हदीसमध्ये काय लिहिले आहे? असे सत्य जे सांगितले जात नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुप्रीम कोर्टाने तीन तलाक रद्द केला असून केंद्राने यावर कायदा करण्यास सांगितले आहे. - Divya Marathi
सुप्रीम कोर्टाने तीन तलाक रद्द केला असून केंद्राने यावर कायदा करण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने मंगळवारी तीन तलाकवर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. कोर्टाने यावर सरकारने कायदा करावा असे मत मांडले आहे. कायदा झाला नाही तरी तीन तलाकचा निर्णय कायम राहील असेही सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने म्हटले आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने 3:2 अशा बहुमताने तीन तलाक घटनाबाह्य आणि बेकायदेशीर ठरविला आहे. DivyaMarathi.Com येथे तुम्हाला सांगत आहे तीन तलाकवर कुराण आणि हदीसमध्ये काय सांगितले आहे. 
 
ते कोणते सत्य आहे जे कट्टरपंथी समोर येऊ देत नाही... 
5 इस्लामिक स्कॉलर्सने कुराणच्या आधारावर सांगतिले कट्टरपंथी कसे भ्रम निर्माण करतात : 

- जीनत शौकत अली, वर्ल्ड इन्स्टिट्यूट ऑफ इस्लामिक स्टडीज फॉर डायलॉगच्या संचालक.
- डॉ. सय्यद रिजवान अहमद, अलाहाबाद हायकोर्टात वकील. यांनी निकाहनामा प्रकरणी याचिका दाखल केली होती. 
- डॉ. मुफ्ती जाहिद, अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे असोसिएट प्रोफेसर. 
- हुस्ने अहमद कादरी, जमीयतुल उलेमा हिंदचे महासचिव. 
- अब्दुल बिस्मिल्लाह, जामिया मिलिया विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख. 
 
1) तिहेरी तलाक सर्वात चर्चित आणि वादग्रस्त मुद्दा  
- गेल्यावर्षी पन्नास हजार पेक्षा जास्त मुस्लिम महिलांनी याविरोधात स्वाक्षरी मोहिम राबवली होती. या मोहिमेला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने विरोध केला होता. अलहाबाद हायकोर्टाने गेल्यावर्षी तीन तलाक असंवैधानिक अर्थात घटनाबाह्य आणि क्रूर असल्याचे म्हटले होते. 
 
वास्तव : कुराण/ हदीसमध्ये काय लिहिले आहे 
- प्री-इस्लामिक अरबस्थानात लोक पत्नीसोबत गुलामाप्रमाणे व्यवहार करत होते. अनेक प्रकारचे तलाक होते. तेव्हा पैगंबर हजरत मोहम्मद यांनी हे सर्व संपवून तलाक-ए-अहसन याची सुरुवात केली. यानंतर दुसरे खलीफा हजरत उमर यांच्या काळात त्यांच्याकडे काही महिला आल्या आणि त्यांनी सांगितले, की आणचे पती हे अनेकदा तलाक म्हणतात आमि नंतर पुनश्च संबंध निर्माण करतात. यापरिस्थितीत हजरत उमर यांनी सांगितले, जर तीन तलाक म्हणत असतील तर तो तलाक मानला जाईल. हा तात्पूरता दिलासा होता. ते स्वतः याला कायमस्वरुपी करण्याच्या विचाराचे नव्हते. तीन तलाकचा उल्लेख कुराणातही नाही. 
 
पती-पत्नीचे भांडण झाले तर...
- सूरा क्रमांक 4 वर्स क्रमांक 35 मध्ये म्हटले आहे, की पती-पत्नीचे भांडण झाले तर दोन्ही कुटुंबांनी त्यात दखल द्यावी. त्यासाठी 90 दिवसांची 'इद्दत' देखील आहे. अर्थात या काळात दोघांमध्ये समेट होणार का याची वाट पाहायची आहे. या दरम्यान जर दोघांमधील परिस्थिती बदलली नाही तर तलाकची प्रक्रिया पूर्ण होते. इस्लाममध्ये काजीची कल्पना कोर्टातील न्यायाधीशांच्या रुपाने केली गेली आहे. 
 
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड काय म्हणाले? 
- 16 एप्रिल रोजी तीन तलाकवर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड म्हणाले होते, की तीन तलाकचा चुकीचा वापर केला गेला तर अशा व्यक्तीला समाजातून बहिष्कृत केले जाईल. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे जनरल सेक्रेटरी मौलाना वलीम रहमानी म्हणाले होते, 'पर्सनल लॉ बोर्डचे मत आहे की तीन तलाक महिलांना संकटातून वाचवण्यासाठी आहे. आम्ही दुसऱ्या धर्मांमध्ये दखल देत नाही तेव्हा दुसऱ्या धर्मानेही आमच्यामध्ये दखल देऊ नये. तलाकचे प्रकरण शरीयत कायद्यानुसार आहे. जेव्हा कोर्टाचा यावर निर्णय येईल तेव्हा पाहू.'
- पर्सनल लॉ बोर्डचे सचिव जपरयाब जिलानी म्हणाले, 'एखादा पुरुष रागात, नशेमध्ये किंवा कोणत्याही उद्देशाशिवाय, तलाकची इच्छा नसताना एकाचवेळी तीन तलाक म्हणतो, शरीयत कायद्यानुसार तो गुन्हेगार असतो. मात्र असा तलाक कधीही स्वीकारला जात नाही. मान्य होत नाही.'
 
व्हॉट्सअॅप-कुरियरनेही तलाक मंजूर 
- मौलाना रहमानी म्हणाले, जर शरीयतनुसार एखाद्या मुस्लिम पुरुषाने व्हाट्सअॅप, कुरियर किंवा पोस्टकार्डने तलाक लिहून पाठवले तरीही तो तलाक मान्य होतो. यासाठी त्यांनी तर्क दिला की लग्नाचे निमंत्रण पोस्टकार्डने दिले तरी ते मान्य होते, त्याच पद्धतीने जर एखाद्याने या विविध माध्यमांचा वापर करुन तलाक दिला तर तो मान्य व्हायला पाहिजे. 
- इस्लाममध्ये स्त्री आणि पुरुष यांना बरोबरीचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की आई-वडीलांनी मुलींना लग्नात हुंडा देण्याऐवजी त्यांना संपत्तीत वाटा दिला पाहिजे. 
 
तिहेरी तलाकवर ऑलि इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे 8 निर्देश 
1# पती-पत्नीमध्ये भांडण झाले तर त्या दोघांनीच त्याला मिटवण्यासाठी पहिले प्रयत्न केले पाहिेजे. 
2# यातून काही तोडगा निघाला नाही तर तात्पूरत्या स्वरुपात संबंध तोडले पाहिजे. 
3# हे प्रयत्न निष्फळ ठरले तर दोन्ही बाजूकडील मंडळींनी त्यांच्यात समेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले पाहिजे. 
4# यातूनही मार्ग निघाला नाही तर पतीने एक तलाक देऊन पत्नीला सोडले पाहिजे. इद्दत चा कालावधी जाऊ दिला पाहिजे. इद्दतच्या कालावधीत जर पु्न्हा दोघांमधील संबंध पुर्ववत झाले तर ते पुन्हा एकदा पती-पत्नी म्हणून वैवाहिक जीवन जगू शकतात. इद्दत पर्यंत जर समझौता झाला नाही तर पती-पत्नीचे नाते आपोआप संपुष्टात येईल. इद्दतच्या काळात महिला जर गर्भवती असेल तर गर्भावस्था संपेपर्यंत इद्दतचा कालावधी राहातो. त्यानंतरही तलाक द्यायचा असेल तर पतीला महर आणि इद्दत च्या कालावधीतील खर्च द्यावा लागतो. महर बाकी असेल तर तत्काळ जमा केली पाहिजे. इद्दत दरम्यान महिला 3 महिने 13 दिवस घरातून बाहेर जाऊ शकत नाही. जरी बाहेर गेली तर सूर्य मावळण्यापूर्वी तिने घरी परत आले पाहिजे. 
5# इद्दत नंतर समझौता झाला तर दोघांच्या रजामंदीने नवी महर देऊन दोघे नव्याने निकाह करुन नव्याने नाते निर्माण करु शकतात. 
6# पती पवित्रतेच्या परिस्थितीत एक तलाक देऊ शकतो, दुसऱ्या महिन्यात दुसरा तलाक आणि तिसऱ्या महिन्यात तिसरा तलाक. तिसऱ्या तलाकच्या आधी दोघांमधील वाद मिटला तर पती जुने नाते कायम ठेवू शकतो.
7# पत्नीला जर पतीसोबत राहायचे नसेल तर ती खुला द्वारे नाते तोडू शकते. 
8# जी व्यक्ती एकाचवेळी तीन तलाक म्हणून तलाक देत असेल अशा व्यक्तीला मुस्लिम समाजाने बहिष्कृत केले पाहिजे, जेणे करुन पुन्हा कोणी असे करणार नाही. 

महिला स्वातत्र्यांवर काय म्हटले आहे.... वाचा पुढील स्लाइडमध्ये
बातम्या आणखी आहेत...