आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तलाक : SC च्या निर्णयाने मुस्लिम महिलांना समानतेचा अधिकार दिला - PM मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तीन तलाक सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरविला आहे. यानिर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केले आहे. मोदींनी ट्विट करुन म्हटले आहे की, हा ऐतिहासिक निर्णय आहे. मुस्लिम महिलांना यामुळे समानतेचा अधिकार मिळेल आणि महिला सशक्तीकरणासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शहांनीही निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे मुस्लिम महिलांना समानता आणि आत्मसन्मानाने जगता येणार असल्याचे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाने 18 महिन्यानंतर तीन तलाकवर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. साधारण हजार वर्षांची प्रथा या निर्णयाने मोडीत निघाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने 3:2 अशा बहुमताने हा निर्णय दिला आहे. त्यात म्हटले आहे, की तीन तलाक वॉइड (शून्य), असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहे.   
 
काँग्रेसने म्हटले - तीन तलाक इस्लामच्या विरोधी
- काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयाचे सर्वच लोक स्वागत करतील अशी आपेक्षा आहे. तीन तलाक हा इस्लाम विरोधी आहे. या निर्णयाने भेदभावाची परंपरा नष्ट झाली आहे आणि महिलांना समानतेचा अधिकार मिळाला आहे. तीन तलाकचा उल्लेख ना कुराणात आहे ना हदीसमध्ये. 
 
 
हेही वाचा.. 
बातम्या आणखी आहेत...