आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ट्रिपल तलाक\' अनिष्ट प्रथा, मुस्लिम बोर्डची सुप्रीम कोर्टात कबुली,..तर पुरुषांवर बहिष्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तीन तलाकवर सर्वाेच्च न्यायालयाने कडक टिप्पणी केल्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आपली भूमिका बदलली आहे. या प्रथेस श्रद्धेचा विषय सांगणाऱ्या बोर्डाने आता शरियामध्ये तिहेरी तलाक गैरलागू प्रथा असल्याचे सांगितले.
 
एकाच वेळी तीन तलाक म्हटल्यास तो अमान्य असेल. ते मुस्लिम समाजासाठी अडचण ठरत आहेत. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल, असे बोर्डाने म्हटले आहे. बोर्डाने सोमवारी सर्वाेच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. ते आधीच्या युक्तिवादापेक्षा भिन्न आहे.
 
महिलांना तीन तलाक अमान्य करण्याचाही अधिकार मिळेल. वधू निकाहनाम्यात तशी अट जोडू शकते. विनाकारण तीन तलाकचा वापर रोखण्यासाठी जागरूकता अभियान चालवले जाईल. लोकांना त्याची पद्धती समजावू. मौलवी व काझींसाठी निर्देश जारी करू, असे त्यात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय घटनापीठाने तीन तलाकवर सर्व युक्तिवाद ऐकून १८ मे रोजी निकाल राखून ठेवला. ताजे प्रतिज्ञापत्रही याच पीठाकडे येईल.
 
बोर्ड समजावणार तीन तलाकची योग्य पद्धत, एका तलाकनेही लग्न संपुष्टात
बोर्ड म्हणाले, शरियानुसार एकाच वेळी तीन तलाक म्हणणे चुकीचे आहे. ते अमान्य आहे. तीन तलाकची योग्य पद्धत लोकांना सांगू. एकदा तलाक म्हटल्यावर तीन महिन्यांपर्यंत पतीने तो मागे न घेतल्यास तो तलाक कायदेशीरदृष्ट्या वैध होईल. पती-पत्नी तीन महिन्यांनंतर विभक्त होऊ शकतात. एकदा तलाक बोलताना पत्नी गरोदर असेल तर तलाकचा अवधी वाढून प्रसूतीपर्यंत होतो. यादरम्यान समेट झाल्यास पती तलाक मागे घेऊ शकतो. बाळंतपणाचा खर्चही पतीला करावा लागेल.

तीन तलाकची ही पद्धतही योग्य
मुस्लिम पतीचा पत्नीसोबत वाद न मिटल्यास पती तिला दरमहिन्याला एक याप्रमाणे तीन तलाक देऊ शकतो. तिसरा तलाक देण्याआधी दोघांमध्ये तडजोड झाल्यास पती तलाक मागे घेईल. मात्र दोघांतील वाद न मिटल्यास तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या तलाकसोबत दोघे पती-पत्नी कायदेशीरदृष्ट्या विभक्त होऊन स्वतंत्र जीवन जगू शकतात. तीन तलाकची ही पद्धत योग्य असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

तलाकचा अधिकार फक्त पतीला
वाद मिटला नाही तर तीन तलाकचा अधिकार फक्त पतीला असेल. पत्नीला तो अधिकार असणार नाही. पती शरिया कायद्यानुसार पत्नीला एक वेळ तलाक म्हणू शकतो. अशा वेळी ती पतीपासून महिला विभक्त होऊ इच्छित असेल तर ती मुस्लिमांमध्ये प्रचलित खुला पर्याय वापरून पतीपासून शकले, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने नव्याने दिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, तीन प्रयत्न : तिहेरी तलाकचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून...
बातम्या आणखी आहेत...