आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TRS Chief K Chandrashekhar Rao Meets PM News In Marathi

टीआरएसप्रमुख- पंतप्रधान भेट; तेलंगणसाठी आभार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तेलंगण विधेयक पारित झाल्याबद्दल पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. त्यांनी नवीन राज्याशी संबंधित मुद्दय़ावरही चर्चा केली.

पंतप्रधानांच्या भेटीचा मुख्य उद्देश त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी होता, असे टीआरएसचे नेते आणि मंड्या मतदारसंघाचे खासदार जगन्नाथ यांनी सांगितले. राव आणि अन्य नेत्यांनी तेलंगणातील वीजटंचाई, एम्सची स्थापना, गॅस वाटप तसेच हैदराबाद शहराची जागतिक प्रतिमा अबाधित ठेवण्यास मदत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

टीआरएस- काँग्रेस आघाडी किंवा काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा योग्य वेळी चर्चिला जाईल, असे जगन्नाथ म्हणाले. असे असले तरी दोन्ही पर्यायांवर चर्चा सुरू आहे. तेलंगणच्या विकासासाठी विलीनीकरण योग्य राहील. मात्र, निवडणुका जवळ आल्याने काँग्रेससोबत आघाडी करणेच योग्य राहील. निवडणुकीनंतर या मुद्दय़ावर चर्चा करता येईल, असे माजी खासदार आणि टीआरएसचे नेते बी. विनोदकुमार यांनी सांगितले. टीआरएसमधील एक मोठा गट आघाडी करण्याच्या विचाराचा आहे. या संपूर्ण प्रक्रियेत के. चंद्रशेखर राव यांना महत्त्व दिले जावे, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.