आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी, भारतीय वंशीय अनेक अधिकारी झाले सामील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन/नवी दिल्ली - डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळी साजरी केली. या वेळी संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या प्रतिनिधी निक्की हेली, अॅडमिनिस्ट्रेटर ऑफ सेंटर्स फॉर मेडिककेअर सीमा वर्मा यांच्यासह अनेक अधिकारी सामील झाले. मागच्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यानही ट्रम्प यांनी दिवाळी सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतला होता.

इव्हान्का ट्रम्पही झाल्या सामील...
- वृत्तसंस्थेनुसार, ओव्हर ऑफिसमध्ये झालेल्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये चेअरमन ऑफ द यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनचे अजित पै, प्रिन्सिपल डेप्युटी प्रेस सेक्रेटरी राज शहाही सामील झाले.
- ट्रम्प यांची मुलगी इव्हान्काही या कार्यक्रमात सामील झाली. मागच्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान इव्हांका यांनी व्हर्जिनिया आणि फ्लोरिडातील मंदिरांत दिवाळी साजरी केली.
- गतवर्षी ट्रम्प यांनी न्यू जर्सीमध्ये भारतीय-अमेरिकी समुदायाच्या एका कार्यक्रमात दिवेही प्रकाशित केले होते.
 
जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष असताना सुरू झाले दिवाळी सेलिब्रेशन
- जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेत ऑफिशियली दिवाळी सेलिब्रेशन सुरू झाले होते.
- तेव्हा व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी सेलिब्रेशन इंडिया ट्रीटी रूममध्ये साजरे करण्यात आले होते. तथापि, व्यक्तिगतरीत्या बुश कधीही दिवाळी सेलिब्रेशनमध्ये सामील झाले नाहीत.
- बराक ओबामांनी त्यांच्या कार्यकाळात पहिल्या वर्षी व्हाइट हाऊसमध्ये दिवे लावले. यानंतरच व्हाइट हाऊसमध्ये हा सण साजरा करण्याचा प्रघात सुरू झाला.
 
कॅनडाच्या पंतप्रधानांनीही साजरी केली दिवाळी
- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी भारतीय कम्युनिटीसोबत दिवाळी सेलिब्रेशन केले. त्यांनी शेरवानी परिधान केली होती. ट्रूडो यांनी तेथे राहणाऱ्या सर्व भारतीयांना या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी भारतीय उच्चायुक्त विकास स्वरूपही उपस्थित होते.
- यासंबंधी ट्रूडो यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...