आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP मध्ये तुम्ही चांगलीच बाजी मारली, डिनरच्या वेळी मोदींना बोलले ट्रम्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी काल (सोमवारी) व्हाइट हाऊसमध्ये सोबत डिनर केले. - Divya Marathi
नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी काल (सोमवारी) व्हाइट हाऊसमध्ये सोबत डिनर केले.
वॉशिंग्टन - जागतिक महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात डिनर टेबलवर काय गप्प रंगल्या असतील याची सर्वांनाच उत्सूकता आहे. विशेष म्हणजे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये मेजवाणीचे निमंत्रण मिळालेले मोदी हे जगातील पहिलेच नेते ठरले आहे. त्यामुळे याबाबतची उत्सूकता अधिक होती. उभय नेत्यांमध्ये डिप्लोमॅसीबरोबरच हलकी-फुलकी बातचीत देखील झाली. यात ट्रम्प यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींना शुभेच्छा दिल्या. मोदींनीही देशातील सर्वात मोठ्या राज्यात बऱ्याच वर्षानंतर तीन चतुर्थांश बहुमत मिळाल्याचे ट्रम्प यांना सांगितले. 
 
- व्हाइट हाऊसमधील ऐतिहासिक ब्ल्यू रुममध्ये मोदींना डिनर देण्यात आले. या रुमची सजावट फ्रेंच स्टाइलची असून व्हाइट हाऊसमधील छोटेखानी मेजवाणीसाठी ब्ल्यू रुम प्रसिद्ध आहे. 
- ट्रम्प म्हणाले, मोदींनी भारतातील सर्वात मोठ्या राज्यात (उत्तर प्रदेश) नुकताच विजय मिळविला आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका भलेही सातव्या स्थानी असली तरीही भारताच्या एखाद्या छोट्या राज्या ऐवढी आहे. 
- 402 विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने 300 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. ट्रम्प म्हणाले, तुमच्या पक्षाला भरपूर जागा मिळाल्या. हा शानदार विजय आहे. 
- मोदी म्हणाले, 'बऱ्याच वर्षानंतर आम्हाला उत्तर प्रदेश विधानसभेत तीन चतुर्थांश बहुमत मिळाले आहे.' मोदींनी अमेरिका दौऱ्यासाठी ट्रम्प यांचे आभार मानले.   
 
हे पण वाचा, 
बातम्या आणखी आहेत...