आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एफडीआय\'च्या मुद्यावर यूपीएला मायावतींच्या पाठिंब्याचा झाला उलगडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस प्रणित यूपीए आघाडी सरकार संकटात सापडले, की बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती संकटमोचकच्या भूमिकेत पुढे आलेल्या सर्वांनी पाहिल्या आहेत. एफडीआयच्या मुद्यावर यूपीए सरकारला मायावतींनी का समर्थन दिले, याचा उलगडा झाला आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार केंद्र सरकारने बहुजन समाज पक्ष आणि मायावती यांच्यावर मेहरनजर करुन लुटियन झोन येथील तीन बंगले एकत्र करुन ती जागा बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशिराम यांच्या स्मारकासाठी देण्याचे मान्य केले आहे. केंद्र सरकारने हा निर्णय एफडीआयवरील मतदानाच्या एक दिवस आधी घेतला होता. एफडीआयच्या मतदानावेळी सरकार संकटात होते, तेव्हा मायावतींनी त्यांना पाठिंबा दिला होता.
कांशिराम यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात सरकारने एवढी घाई का केली यावरूनच मायावतींच्या पाठिंब्याचा उलगडा होतो. शहर विकास मंत्रालयाच्या डायरेक्टर ऑफ इस्टेटने 4 डिसेंबर 2012 रोजी लुटियन झोन येथील गुरुद्वारा रकाबगंज रोडवरील बंगला क्रमांक 12, 14 आणि 16 यांना एकत्र करुन स्मारकाला परवानगी देणारा आदेश काढला होता. त्याच दिवशी मायावतींनी शहर विकास मंत्रालयाला पत्र पाठवून बंगल्यांच्या ताब्याबद्दल विचारणा केली होती. कमलनाथ तेव्हा शहर विकास मंत्री होते आणि त्यांच्याच मंत्रालयाने परवानगी दिली होती.

पुढील स्लाइडमध्ये, संसदेत अशी होती मायावतींची रणनिती