आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे माँ बद्दल रोज नवे खुलासे, चौकशीत समोर आले होते खरे आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राधे माँ संबंधीचा वाद काही थांबायचे नाव घेत नाही. वादग्रस्त राधे माँ बद्दल रोज नवे-नवे खुलासे होत आहेत. राधे माँ 1992 पासून 2005 पर्यंत सासरी अर्थात पंजाबमधील मुकेरिया येथे चौकी लावत होती. या दरम्यानच ती मुंबईत आली. काही दिवसांनी मुकेरियाच्या खानपूर येथे तिचे एक मंदिर उभारण्यात आले. या मंदिरात राधे माँचे फोटो लावण्यात आले आहे. आता या मंदिराची देखरेख राधे माँची बहिण रजनी उर्फ रज्जी मौसी करते. हिचा विवाह मुकेरियाच्या नौशहरा पतन येथे झाला आहे. राधे माँ मुंबईत आल्यानंतर रज्जी मौसी गावातील लोकांच्या समस्या सोडवते. राधे माँचा मुंबईत आता मोठा दरबार असून तिचा प्रसाद म्हणेज अत्यंत घाणेरडा प्रकार आहे.
मुंबईत कौटुंबिक छळाचे प्रकरण समोर आल्यानंतर चेर्चेत आलेल्या राधे माँवर गुजरातमधूनही आरोप झाला आहे. गुजरातमधील कच्छ भागातील अंजार जिल्ह्यात राधे माँच्या चार भक्तांनी तीन लहान मुलांना विष देऊन मारले आणि नंतर त्या चौघांनी फाशी लावून आत्महत्या केली होती. आत्महत्या करणाऱ्या सर्वजण एकाच कुटुंबातिल होते. या कुटुंबाबद्दल आता बोलले जात आहे, की हे कुटुंब अतिशय सधन होते. त्यांनी सर्व संपत्ती विकून कोट्यवधी रुपये राधे माँला दिले होते. घराच्या भिंतीवर सगळीकडे राधे माँ - राधे माँ असे लिहिलेले आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, पूर्ण खुलासा...