नवी दिल्ली - सोशल मीडिया युजर्स कोणताही फोटो आणि घटना यांची सत्य-असत्यता न पडताळता त्याला शेअर करत राहातात. यामुळे बऱ्याचदा गोंधळ उडतो आणि सामाजिक स्वास्थ्यही बिघडण्याची शक्यता असते. गेल्या महिन्यात यूजर्सने अशीच माहिती शेअर केली त्यात काही फोटोज् आणि कंटेट होते, ज्यात कोणतीच सत्यता नव्हती. मात्र यामुळे काही लोकांची प्रायव्हसी धोक्यात आली.
आसाम विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या एका महिला आमदारांच्या नावावर दुसऱ्याच एका महिलेचे फोटो शेअर केले गेले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांचे सत्य बाहेर आले होते. divyamarathi.com तुम्हाला या पॅकेजमधून असेच काही फोटो दाखविणार आहे, जे सोशल मीडियावर चुकीच्या कारणांमुळे शेअर झाले.
हे होते या फोटोमागील सत्य
- वरील स्लाइडवर जो फोटो आहे, तो गेल्या महिन्यात व्हायरल झाला होता.
- आसाम विधानसभा निवडणूक निकालानंतर सोशल मीडिया युजर्सने भाजपच्या तिकीटावर विजयी झालेली अभिनेत्री अंगुरलताच्या नावाने हे फोटो शेअर केले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले गेले होते.
- अनेकांना हे फोटो खरे वाटत होते, मात्र हे फोटो आमदार अंगुरलता यांचे नसून अहमदाबादची फिटनेस ट्रेनर सपनाचे होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोशल मीडियाने कोणाचे कसे फोटो कोणत्या चुकीच्या कारणामुळे केले शेअर
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)