अमेरिकच्या संसदेतील एकमेव हिंदू महिला खासदार तुलसी गबार्ड भारताच्या दौ-यावर आलेल्या आहेत. त्यांनी भारत-अमेरिका संबंधावर पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या सोबत चर्चा केली.
आपण अमेरिकेत हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांना दिले.
अमेरिकेतील 'हवाई' मतदासंघातून खासदार म्हणून निवड झालेल्या तुलसी गबार्डने पर्यावरण समस्या, दहशतवाद आणि अर्थव्यावस्था या विषयावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी अर्थिक विकास दर वाढण्यासाठी केलेला प्रयत्न आणि देशभरात चालवण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाचे कौतुक केले. अमेरिकेत हिंदू संस्कृतीचा आणि भारतीय परंपरांचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने केला जात आहे याविषयी गर्बाड यांनी पंतप्रधान मोदींना माहिती दिली.
पुढील स्लाईडवर पाहा तुलसी गबार्ड यांची भारत दौ-याची फोटो...