आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुर्कस्‍तानच्‍या दहशतवादी संघटनेचा भारतात प्रवेश, परराष्‍ट्र मंत्र्याची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुर्कीमध्‍ये गत महिन्‍यात सत्‍तापालट करण्‍याचा अयशस्‍वी प्रयत्‍न करणाऱ्या फेतुल्ला गुलेन याच्‍या FETO या दहशतवादी संघटनेने भारतातही आपले संघटन वाढवायला सुरुवात केली आहे, अशी माहिती तुर्कीचे परराष्‍ट्र मंत्री मेवलुत कावुसोगलू यांनी दिली. ते भारताच्‍या दौऱ्यावर आहेत. यावर भारत सरकारने चिंता व्‍यक्‍त केली असून, सुरक्षा संस्‍थांना सर्तक केले आहे. गत महिन्‍यात FETO ने तुर्कीचे राष्‍ट्रपती तैयप एर्दोगन यांना पदच्‍च्‍युत करण्‍याचा प्रयत्‍न केला होता. या प्रकरणी एर्दोगन यांनी अमेरिकेत वास्‍तव्‍यास असलेला मौलवी फेतुल्ला गुलेन याला दोषी ठरवले होते.
पूर्ण जगात सक्रिय आहे FETO...
> मेवलुत यांनी सांगितले- FETO ही दहशतवादी संघटना संपूर्ण जगात गुप्‍तपणे आपले जाळे विस्‍तारत आहे.
> दुर्दैव म्‍हणजे ही संघटना आता त्‍यांचे सहकारी आणि शिक्षण संस्‍थांच्‍या माध्‍यमातून आता भारतात आली आहे.
> भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्‍वराज्‍य यांच्‍यासोबत झालेल्‍या बैठकीनंतर त्‍यांनी या बाबत माहिती दिली.
> या बाबत तुकीच्‍या परराष्‍ट्र मंत्र्याने पीटीआयला दिलेल्‍या मुलाखतीत म्‍हटले, "माझ्या समकक्ष असलेल्‍या भारतीय लोकप्रतिनिधीला मी या बाबत सूचित केले आहे."
FETO वर तत्‍काळ कारवाई करा : तुर्की
> मेवलुत म्‍हणाले- " ज्‍याही देशांत FETO आहे, त्‍या सर्व देशांनी तिच्‍यावर कारवाई करावी, असे आवाहन आम्‍ही केले आहे.
> दहशतवादाचे कोणतेही रुप असो ते भारत आणि तुर्की या दोघांसाठी घातक आहे, असेही ते म्‍हणाले.
भारत काय म्‍हणाला ?
तुर्कीच्‍या मंत्र्यांनी केलेल्‍या गौप्‍यस्‍फोटावर भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप म्‍हणाले, तुर्कीने व्‍यक्‍त केलेली चिंता भारत गांर्भीयाने घेणार आहे.
- त्‍या अनुषंगाने आम्‍ही सुरक्षा संस्‍थांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
कोण आहे फेतुल्ला गुलेन?
> फेतुल्ला गुलेन हा एक मुस्लिम धर्म प्रचारक असून, सध्‍या तो अमेरिकेत राहत आहे.
> इस्लामी धर्मगुरू गुलेनचे तुर्कीमध्ये लाखो अनुयायी आहेत.
> दीडशेहून अधिक देशांत त्याच्या शाळा आहेत. अब्जावधी डॉलरचा त्याचा कारभार आहे.
> तो अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियात राहत आहे. गुलेन समर्थक तुर्कीचे युद्धखोर आहेत.
> मुल्ला गुलेन न्यायपालिका, शिक्षण व्यवस्था मीडिया आणि लष्करात आपला गट बनवून सत्ता पालटू पाहत आहे, असे तुर्कीने म्हटले आहे.