आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tutor Was Brutally Beats Three Year Old Child Latest News

VIDEO : तीन वर्षाच्या विद्यार्थ्याला लाथा घालणारी, ही कसली शिक्षिका ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - लहान मुलाबरोबर अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यावेळचे प्रकरण पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्याचे आहे. महिला होम ट्यूटरने (शिक्षिका) तीन वर्षाच्या मुलाला अत्यंत बेदम मारहाण केल्याचे सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाले. या शिक्षिकेने मुलाचा गळा दाबला, त्याला उचलून फेकले एवढेच नाही तर त्याला लाथा घालायलाही मागेपुढे पाहिले नाही. मुलगा आक्रोश करत होता तरीही या शिक्षिकेला दया आली नाही. ही घटना मंगळवारची आहे.

या प्रकरणी बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी या मुलाची आई घरातच दुस-या खोलीत होती. काही वेळाने मुलाची अवस्था पाहून तिला या घटनेबाबत माहिती मिळाली. त्याच्या आईने सांगितले की, तिच्या मुलाच्या संपूर्ण शरिरात वेदना होत होत्या. काही ठिकाणी रक्तही येत होते. त्याच्या पाठीवर जखमा होत्या. घरातील सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये सर्व प्रकार कैद झाला. हे जेव्हा ट्यूटरच्या लक्षात आले तेव्हा, तीने या प्रकरणी माफी मागितली.

पुढे पाहा...या शिक्षिकेचे क्रौर्य दाखवणारा व्हिडीओ...