आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Channel\'s Sting Operation: Opinion Polls Are Fixed News In Marathi

निवडणूकपूर्व जनमत चाचणीतही फिक्सिंग; वाहिनीचे स्टिंग, कंपन्यांचे बिंग फुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांच्या सर्वेक्षणातही फिक्सिंग आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे बिंग फुटले असून ‘सी-फोर’सह देशातील 11 नामांकित कंपन्या यात गुंतल्याचे स्पष्ट होताच इंडिया टुडेने सी-व्होटरशी असलेला करार रद्द केला.

‘ऑपरेशन प्राइम मिनिस्टर’नावाने करण्यात आलेल्या या स्टिंगनंतर या वृत्तवाहिनीने दावा केला आहे की वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवर प्रसिद्ध होणारे सर्वेक्षणाचे निष्कर्ष एक बनाव आहे. या स्टिंगमध्ये 11 बातमीदारांनी 11 विविध पोल एजन्सींशी संपर्क साधून हवे ते निकाल देण्याची मागणी केली. सी-फोरसारख्या काही कंपन्या ‘माजिर्न ऑफ एरर’चा वापर आकड्यांतील घोटाळ्यासाठी करत आहेत. सर्वेक्षणासाठी कंपन्यांनी घेतलेल्या रकमांमध्येही अनियमितता असून यातून काळा बाजार सुरू असल्याचे स्टिंगमधून स्पष्ट झाले.

अशी आहे पद्धत :
कंपन्या आपले ओपिनियन पोल प्रसिद्ध करण्यापूर्वी विविध राजकीय पक्षांशी संपर्क साधतात. संबंधित पक्षांच्या सोयीनुसार याचे निकाल बदलतात. स्टिंग करणार्‍या वाहिनीचे मुख्य संपादक विनोकद कापडी यांच्या मते, काही वर्षांपूर्वी निवडणुकीवर एक-दोन ओपिनियन पोल घेतले जात. आता आठवड्याला कुणीतरी सर्वेक्षण करतो आणि निकाल जाहीर होतात. या कंपन्या इतक्या कमी कालावधीत एवढे व्यापक सर्वेक्षण करतातच कशा?

इंडिया टुडेने सी-वोटरशी संबंध तोडले
या स्टिंग ऑपरेशनचे परिणाम तातडीने दिसू लागले आहेत. इंडिया टुडे समूहाने सी-वोटरशी असलेला करार थांबवून सी-वोटरला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. यावर सी-वोटरचे यशवंत देशमुख म्हणाले, ‘गेल्या वीस वर्षांची माझी विश्वासार्हता संपवण्याचा हा प्रयत्न असून माझी प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र आहे.’ स्टिंग करणार्‍या वृत्तवाहिनीने त्यांच्याकडील ठोस पुरावा असलेली पूर्ण चित्रफित दाखवली नाही तर या वाहिनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला.