नवी दिल्ली - टीव्ही पत्रकार अमृता राय (४४) आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह (६८) यांनी अखेर लग्न केले. मात्र, अमृता यांनी लग्नाची माहिती दिलेल्या फेसबुक पोस्टची सध्या चर्चा आहे. अमृता यांनी या पोस्टमध्ये दीड वर्षातील
आपले अनुभव सांगितले अाहेत. त्यांनी केलेली पोस्ट पुढीलप्रमाणे...
गेले दीड वर्ष तणावपूर्ण आणि त्रासदायक होते. या कठीण परिस्थितीत ज्यांनी मला साथ दिली त्यांचे मनापासून आभार. मी सायबर क्राइमची बळी ठरले. याव्यतिरिक्त मला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली. काही चूक नसतानाही माझ्याबाबत अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला. ज्या लोकांचे प्रेम आणि आदरासारख्या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्न केला. स्वत:वर आणि दिग्विजय सिंहांवर विश्वास ठेवत काम करत राहिले. आम्हा दोघांच्या वयातील अंतरावरून प्रश्न उपस्थित केले जातील, याची मला कल्पना होती. मात्र, वयाच्या या वळणावर माझ्यासाठी काय योग्य व काय अयोग्य हे मला चांगले समजते. आपण एका आधुनिक व प्रगतिशील भारतात राहतो. स्वत:चे आयुष्य जगण्याचा आणि निर्णय घेण्याचा घटनेने अधिकार दिला आहे. मी एक व्यावसायिक महिला असून आपल्या करिअरमध्ये कष्ट घेतले आहेत.
अन्य आधुनिक महिलांप्रमाणे माझाही स्वत:च्या क्षमतेवर विश्वास आहे. त्यामुळे स्वत:ची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वत: पेलू शकते. दिग्विजय सिंहांवर प्रेम होते त्यामुळे त्यांच्याशी लग्न केले. ते आपली संपूर्ण संपत्ती मुलांच्या नावावर करू शकतात. मी आपल्या करिअरमध्ये पुढे जाऊ इच्छिते. पुन्हा एकदा सर्व मित्र, कार्यालयातील सहकारी आणि हितचिंतकांना धन्यवाद .
पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटो...