नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु झाली आहे. परिणामी सरत्या थंर्डीत दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. प्रत्येक राजकीय पक्षातील दिग्गज नेते प्रचारात व्यस्त आहेत.
दुसरीकडे, आम आदमी पक्षाच्या प्रचारसभेत प्रत्येक दिवशी नवा पाहुणा दिसत आहे. 'उतरन' या टीव्ही मालिकेतील 'ठाकूर' आयूब खान आणि 'बालिका वधू'मध्ये सुमित्राची भूमिका साकारणारी स्मिता बंसल हिने '
आप'मध्ये प्रवेश केला आहे. एवढेच नाही तर रविवारी रात्री सगळ्यांनी 'डिनर' घेतले. आतापर्यंत 'आप'मध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.
आयूब खान आणि स्मिता बसंलने रविवारी पक्षाच्या प्रचारात सहभाग घेतला. यावेळी 'आप'चे नेत आशुतोष उपस्थित होते. याशिवाय संजय सिंह, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, पंकज गुप्ता, आशुतोष, डॉ. धर्मवीर गांधी, आशीष खेतान, दिलीप पांडेय, प्रो. आनंद कुमार, एचएस फुल्का, शहनाज हिंदुस्तानी हे 'आप'चे स्टार प्रचारक आहेत. सगळे दिल्लीतील विविध भागात पक्षाचा प्रचार करत आहेत.