आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twele Cylinders Decison Take This Week Rahul Gandhi Demanded To Petrolium Minister

बारा सिलिंडरचा निर्णय याच आठवड्यात, राहुल गांधी यांनी पेट्रोलियममंत्र्यांकडे केली होती मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सबसिडीवरील सिलिंडरची संख्या 9 वरून 12 करण्याचा निर्णय याच आठवड्यात घेतला जाऊ शकतो. राहुल गांधी यांनी पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईलींकडे ही मागणी केली होती.
स्वयंपाकाच्या गॅसचे पाच किलोग्रॅम वजनी एलपीजी सिलिंडर पेट्रोल पंपांवर विकण्याच्या योजनेचे उद्घाटन मंगळवारी मोईली यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी अनुदानित सिलिंडरची संख्या 12 करण्याबाबत याच आठवड्यात निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत दिले. देशात 15 कोटींपैकी 89.2 टक्के ग्राहक वर्षाकाठी 9 पेक्षा कमी सिलिंडर वापरतात. फक्त 10 टक्के ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागतात, असेही मोईली म्हणाले.
सिलिंडरचा कोटा 12 केला तर एलपीजी ग्राहकांपैकी 97 टक्के ग्राहकांना महागडे सिलिंडर खरेदी करण्याची गरज पडणार नाही, अशी माहितीही मोईलींनी दिली.
4 हजार कोटींचा बोजा
ग्राहकांना 9 ऐवजी 12 अनुदानित सिलिंडर देण्याचा निर्णय झाला तर सरकारी तिजोरीवर वर्षाकाठी 3 ते 4 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. स्वयंपाकाच्या गॅसवर सरकार अगोदरच 46 हजार कोटींचे अनुदान देत आहे.