आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twenty Percent Payment Increment May Be Possible In Central Govt Employee

7th पे कमीशन: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 20 टक्क्यांपर्यंत वाढ शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर/नवी दिल्ली- ७ व्या वेतन आयोगाने केंद्राला शिफारशी सादर केल्या असून त्यावर ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय होईल. गरज भासल्यास काही बदलही शक्य आहेत. त्यानंतर या शिफारशी अर्थ मंत्रालयाकडे पाठवल्या जातील.

नव्या आयोगात आयएएस
आयआरएस अधिकाऱ्यांना समान पे स्केल देण्याचा तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात २०% वाढीचाही प्रस्ताव आहे. आयोगाचे अध्यक्ष अशोककुमार माथूर, सचिव मीना अग्रवाल आणि सदस्य डॉ. राथिन राय व विवेक राक यांनी हा अहवाल तयार केला आहे. सध्या कर्मचाऱ्यांसाठी ३२ पे स्केल आहेत. भारत सरकारचे सचिव आणि मंत्रिमंडळ सचिव यांच्यासाठीही वेगवेगळे पे स्केल आहेत. त्यात घट करून १२ करण्याचा प्रस्ताव आहे. आयएएस, आयपीएस व आयआरएसचे पे स्केल समान असेल. त्यामुळे आम्हाला आयएएसपेक्षा कमी वेतन मिळते, ही आयपीएस व आयआरएसची तक्रार राहणार नाही.

३१ डिसेंबरपर्यंत नव्या आराखड्यावर निर्णय, गरज भासल्यास बदल शक्य
सेवानिवृत्तीची मर्यादा
- अधिकाऱ्यांना ३० वर्षांची सेवा अथवा ५५ व्या वर्षी श्रेणीनुसार व्हीआरएसचा पर्याय देण्याचा प्रस्ताव नव्या वेतन आयोगाने केला आहे.
- एखाद्या अधिकाऱ्यावर आरोप असेल तर तो ५५ व्या वर्षी सेवानिवृत्तीची घोषणा करू शकतो. कर्मचाऱ्यांसाठी ३३ वर्षांची सेवा अथवा ६० वर्षे यापैकी जे कमी असेल, सेवानिवृत्तीचा प्रस्ताव आहे.

घरभाडे कर्मचाऱ्यांना ए, बी-१,बी-२ व सीसाठी २५%, तर ग्रामीण भागासाठी २० % घरभाड्याचा प्रस्ताव. सध्या वेगवेगळे भाग अथवा पदांसाठी १० ते ३० % पर्यंत घरभाडे भत्ता मिळतो. म्हणजे आता घरभाडे भत्ताही समान असेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ‘दिव्य मराठी’कडील अहवालाची प्रत... वर्षातून एकदा वेतनवाढीची शिफारस... मुलांचा शैक्षणिक भत्ता... ३२ ऐवजी १३ श्रेणी... नवे पे स्केल असे राहणार...