आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरुषी हत्‍याप्रकरणाला कलाटणी, हेमराजच्‍या गुप्‍तांगावर होती सूज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आरुषी तलवार आणि हेमराज हत्‍याप्रकरणाला कलाटणी मिळण्‍याची शक्‍यता आहे. दोघांचेही शवविच्‍छेदन करणा-या डॉक्‍टरांनी खळबळजनक माहिती दिली. याप्रकरणात लैंगिक संबंधाचा मुद्दा समोर आला आहे. हेमराजच्‍या लिंगावर सूज होती. असे केवळ दोनच परिस्थितीमध्‍ये होऊ शकते. मृत्‍युपूर्वी एखाद्याने संभोग केला किंवा तयारीत असल्‍यास लिंगावर सूज येते. आता याप्रकरणाची सुनावणी 25 मार्चला होणार आहे.

नोयडा जिल्‍हा रुग्‍णालयातील वरिष्‍ठ डॉक्‍टर नरेश राज यांची सरकारी पक्षाकडून तपासणी करण्‍यात आली. त्‍यांनी 17 मे 2008 ला हेमराजचे शवविच्‍छेदन केले होते. रात्री 9 वाजता कृत्रिम प्रकाशात शवविच्‍छेदन करण्‍यात आले होते. मृतकाचे वय जवळपास 45 वर्षे होते. त्‍याच्‍या डोक्‍यामागील हाडामध्‍ये फ्रॅक्‍चर होते. याशिवाय त्‍याच्‍या शरिरावर जखमा आणि खरचटल्‍याच्‍या खुणा होत्‍या.

डॉक्‍टरांनी सांगितले की, डोक्‍याच्‍या हाडावर झालेली जखम एखाद्या कठोर वस्‍तुमुळे होऊ शकते. गोल्‍फ स्टिक किंवा हॉकी स्टिकसारख्‍या वस्‍तूने मारल्‍यास अशी जखम होऊ शकते. हेमराजचा गळाही एका बाजुने कापलेला होता. सुमारे 30 सेंटीमीटर लांबीची ही जखम होती. श्वासनलिकाही कापलेली आढळली होती. हृदयाचे दोन्‍ही चेंबर्स रिकामे होते. यकृतात 25 मिलीलिटर द्रव्‍य आढळले होते. मृत्‍यू दिड ते दोन दिवसांपूर्वी रक्तस्‍त्रावामुळे झाला होता.