आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेअर इज पप्पू ? , ट्विटर नेटिझन्सचा राहुल गांधींना प्रश्‍न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर शनिवारी पप्पूच्या विनोदाचा महापूर उसळला. राहुल गांधींच्या बाबतीत व्हेअर इज पप्पू (पप्पू कुठे आहे ) अशी खिल्ली उडवणारे ट्विटर नेटिझन्सनी टाकले आहेत.


उत्तराखंडमधील महापुराच्या धक्क्यामुळे देश हादरला असताना पंतप्रधानपदाचे दावेदार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचा ठावठिकाणा नसल्याने नेटिझन्स मंडळींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी उत्तराखंडचा दौरा करून पूरग्रस्तांना दिलासा दिला. काँग्रेसचे युवराज मात्र अद्यापही गायब आहेत. काँग्रेसने मात्र राहुल यांची ही गैरहजेरी फारशी मनावर घेतलेली नाही.कोण उत्तराखंडला गेले अथवा कोण गेले नाही हे महत्त्वाचे नाही. मदतकार्य कसे सुरू आहे हे महत्त्वाचे. सोनिया गांधी आणि पंतप्रधान मदतकार्यावर निगराणी ठेवून आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते राज बब्बर यांनी राहुल यांची पाठराखण केली.