आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#RahulReturns: सोशल मीडिया म्हणाले, IIN मधून राजकारणाची पदवी घेऊन परतले राहुल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी 56 दिवसांच्या सुटीनंतर गुरुवारी दिल्लीत परतले. त्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर त्यांच्यासंबंधीचे जोक्स, फोटोज् शेअर केले जात आहेत. सकाळी 11 वाजतापासून #RahulReturns, #RahulGharWapsi आणि #RahulOnLeave सारखे हॅशटॅग टॉप ट्रेंडिंगमध्ये आहेत. ट्विटरवर लोक म्हणत आहेत, की राहुल गांधींनी थायलंडहून राजकारणाची पदवी संपादन केली आहे. गायत्री रेड्डीने यासंबंधीचे ट्विट केले आहे. @Gayatritwit लिहिते, 'राहुल गांधी आयआयएन मधून राज्यशास्त्रात पदव्यत्तर पदवी घेऊन परतले आहेत. आम्हालाही दोन महिन्यांच्या सुटीत अशी पदवी मिळाली पाहिजे होती.'
राहुल गांधी सुटीवर गेले तेव्हापासून ते परत आले तरी अजूनही काँग्रेसकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही, की ते कुठे गेले होते. मात्र, सोशल साइट युजर्स आपापला तर्क लावत आहेत.
प्रसिध्द लेखिका आणि आपल्या ट्विटमुळे चर्चेत राहाणाऱ्या शोभा डे यांनी ट्विट केले आहे, की 'परफेक्ट टायमिंग. एकीकडे मोदी साहेब कॅनडामध्ये आहेत आणि दुसरीकडे राहुल बाबा घरी परत आले आहेत.' लेखक चेतन भगतनेही राहुल गांधींच्या सुटीवर ट्विटच्या माध्यमातून चिमटा काढला आहे. ते लिहितात, 'राहुल गांधी जर परत येणार नसतील तर त्यांनी त्यांच्या स्लीपर्स (चप्पल) पाठवाव्या, जेणे करुन काँग्रेस त्या गादीवर ठेवून पक्ष चालवेल.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काही मजेदार ट्विटस