आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारकडून चोर पावलांनी #पोर्न_बॅन? TWITTER यूजर्स भडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून हळूहळू पोर्न साइट्सवर बॅन लावले जात आहे. त्‍या अनुषंगाने काही इंटरनेट प्रोव्‍हाइडर्सकडून पोर्न साइट्सचा एक्सेसही बंद करण्‍यात आल्‍यात. त्‍यामुळे बहुतांश इंटरनेट यूजर्स संतप्‍त झाले असून, त्‍यांनी त्‍यांच्‍या रागाला टि्वटरवरून वाट मोकळी करून दिल्‍याचे शनिवारी समोर आले.
शनिवारी सायंकाळी काही यूजर्संनी या मुद्दयाला जगजाहीर विरोध केला. त्‍यामुळे आज (रविवार) सकाळपर्यंत #पोर्न_बॅन हा विषय टि्वटरच्‍या टॉप ट्रेन्डिंग टॉपिकमध्‍ये जाऊन बसला. काही दिवसांपूर्वी सर्वोच्‍च न्‍यायालयाने निर्वाळा दिला होता की, पोर्न साइड्सला बॅन केले जाऊ शकत नाही. कुणी चार भिंती आड काही पाहत असेल तर त्‍याला थांबवायचे तरी कसे, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले होते.
का होतेय बॅनची चर्चा
पोर्न साइड्स बॅनची पुन्‍हा अचानक चर्चा होण्‍याचे कारण म्‍हणजे बीएसएनएल, एमटीएनएल, वोडाफोन आदी इंटरनेट सेवा देणा-या कंपन्‍यांनी बहुचर्चित आणि प्रसिद्ध असलेल्‍या काही पोर्न साइट्स बॅन केल्‍या आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, जागतील सार्वधिक 13 लोकप्रिय पोर्न साइट्सपैकी 11 चे एक्सेस बंद झाले आहे. लीगली इंडियाच्‍या एका रिपोर्टनुसार, उर्वरित दोन साइट्सला दिल्लीच्‍या स्पेट्रानेट सर्व्हिस प्रोव्‍हाइडर नेटवर्कवर एक्सेस केले जात आहे. दरम्‍यान, एयरटेलच्‍या नेटवर्कवर सर्व प्रकारच्‍या पोर्न साइट पूर्वीप्रमाणेच एक्सेस होत आहेत. दुसरीकडे, रेडिट इंडियाच्‍या थ्रेडवरही काही यूजर्संने पोर्न साइट्सला ब्लॉक करण्‍यात आल्‍याचा दावा केला आहे. या साइट्सला एक्सेस करण्‍याचा प्रयत्‍न केला असता Directory doesn’t exist चा मेसेज दिसत आहे.
टि्वटर आलेल्‍या काही निवडक प्रतिक्रिया
@IndiaSpeaksPR
I have of course never been to a porn site in my whole life. But I fully wholeheartedly oppose any Govt move to ban them
@vivekisms
Ban homosexuality. Ban porn. Ban certain words in movies. Ban alcohol. Ban beef. Ban everything not in our culture. Hello dark age!
@Madan_Chikna
Ban on Tobacco - Lol
Ban on Eggs - Lol
Ban on Beef - Lol
Ban on Porn - THIS IS SPARTA !!
@aanchalator
No religion, no political party, no leader can unite this country like the ban on porn can.
@Aagan86
Someone must remind the current government that they were elected to run the nation not become moral science teacher #pornban
@Me_Haresh
Dear @narendramodi ji,As a bachelor, how can you allow #PornBan
पुढील स्लाइड्सवर पाहा टि्वटरवरील काही निवडक पोस्ट्स....