आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विट करुन केली तक्रार, सुषमा म्हणाल्या- \'ब्रदर मी तुमची मदत करु शकत नाही\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारचे अनेक मंत्री हे सोशल साइट्सवर अॅक्टिव्ह असतात. त्यात कोण कमी आणि कोण जास्त असाही फरक करता येणे अवघड आहे. त्यातल्या त्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या सोशल मीडियावरील अॅक्टिव्ह मंत्र्यांमध्ये आघाडीवर असतात. ट्विटर आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर लोक त्यांना तक्रारी पाठवतात आणि त्याही तत्परतेने त्यांची मदत करतात. सोमवारी मात्र एका व्यक्तीने ट्विटवर केलेल्या मदतीच्या याचनेला स्वराज यांनी नकार दिला.

झाले असे, की मोदीपल्ली वेंकट नावाच्या एका व्यक्तीने सुषमा स्वराज आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना ट्विट करुन रेफ्रिजेरेटर बद्दलची तक्रार केली. त्याने ट्विट केले, की एका साऊथ कोरियन कंपनीने त्याला नादुरुस्त रेफ्रिजेरेटरची विक्री केली आणि आता ते बदलून देण्यास नकार देत आहे.

सुषमा स्वराज यांनी दिले हे उत्तर..
- मोदीपल्ली वेकंटने सोमवारी सकाळी सुषमा स्वराज, पासवान आणि कंपनीला टॅग करुन एक ट्विट केले. त्यात लिहिले, 'साऊथ कोरियन कंपनीने मला डिफेक्टिव्ह रेफ्रिजेरेटरची विक्री केली आहे, आता ते बदलून देण्यास तयार नाही.'
- दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले, 'ते मला रेफ्रिजेरेटर दुरुस्त करुन घेण्यासाठी आग्रह करत आहेत.'
- वेकंट यांच्या ट्विटला उत्तर देताना स्वराज यांनी लिहिले, 'ब्रदर रेफ्रिजेरेटरच्या प्रकरणात मी तुमची मदत करु शकत नाही. मी संकटात सापडलेल्या लोकांची मदत करण्यात व्यस्त आहे.'
- सुषमा स्वराज यांच्या उत्तराची सोशल मीडियामध्ये चर्चा होत आहे. ट्विटर युजर्सने स्वराज यांच्या संवेदनशीलतेचे कौतूक केले आणि त्यासोबत वेकंट यांच्या मागणीचा समाचार घेतला.

Twitter वर सुषमांचे 52 लाख फॉलोअर्स
- सुषमा स्वराज या twitter वर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या महिला नेत्या आहेत.
- Twitter वर त्यांचे 52 लाख फॉलोअर्स आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदीपल्लीच्या ट्विटला सुषमांनी दिलेले उत्तर
बातम्या आणखी आहेत...