आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter War Breaks Out Between India And Pakistan​ As Ceasefire Violations Continue

बिलावलची बकवास सुरूच; #CowardModi ला #BuzdilPakistan ने प्रत्युत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय सरहद्दीवर पाकिस्तानकडून बॉम्बगोळे आणि बंदूकीच्या फैरी झडत असताना, ट्विटरवर भारतीय आणि पाकिस्तानींमध्ये वाक्-युद्ध रंगले आहे. भारतात ट्विटरवर #BuzdilPakistan ट्रेंडिंगमध्ये आहे. पाकिस्तानने #CowardModi च्या माध्यमातून सीमेवर सुरु असलेल्या शस्त्रसंधीला भारत जबाबदार असल्याचे म्हटले होते, त्याला हे उत्तर असल्याचे मानले जात आहे.
ट्विटरवर #BuzdilPakistan ट्रेंडमध्ये पाकिस्तान विरोधी कॉमेंटसचा पूर आला आहे. शेकडो ट्विटर युजर्स पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबाराचा तीव्र शब्दात निषेध करत आहेत. एवढेच नाही, तर काही अकाऊंट्सवर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे वाचाळ नेते बिलावल भुट्टो यांच्या तोंडाचा पट्टा सुटलेलाच आहे. बिलावल यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर भारताविरोधात गरळ ओकली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी इंग्रजी ऐवजी हिंदीमध्ये ट्विट केले आहे. बुधवारी बिलावल यांनी केलेल्या ट्विटमध्ये इस्त्रायलची स्पेलिंग चुकीची लिहिली होती. त्यावरुन भारतीय ट्विटर युजर्सनी त्यांची चांगलीच 'शाळा' घेतली. आज (गुरुवार) केलेल्या ट्विटमध्ये बिलावल म्हणाले, 'माझ्या दोन स्टेटमेंटमुळे भारतीयांची झोप उडाली आहे. ही तर फक्त सुरवात आहे, पुढे पाहा, काय-काय होते... काश्मीर पाकिस्तानचेच होईल.'
बिलावल यांच्या ट्विटनंतर भारतीयांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. ज्योति प्रकाश या नावाने असलेल्या ट्विटर युजरने लिहिले आहे, '#BuzdilPakistan तुम्ही सेंटर फ्रेश खा आणि तुमच्या नापाक जिभेला लगाम घाला.' बुधवारच्या ट्विटमध्ये बिलावल यांनी भारत इस्त्रायल मॉडेल वापरत असल्याचा आरोप केला होता. त्यावरही शेकडो भारतीयांनी तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.
पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला जात आहे. बुधवारी रात्रभर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या 45 चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सेना निवासी भागात त्यांच्या लोकांच्या आडून फायरिंग करत आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराला त्यांना उत्तर देण्यात अडचणी येत आहेत. पाकिस्तानची ही चिथावणी खोर कारवाई असल्याचे मानले जाते.
पुढील स्लाइडवर पाहा, पाकिस्तान आणि बिलावल भुट्टोची ट्विटरवर कशी होत आहे फजिती...