आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवर मोदी वॉर; भाषणाची तुलना विवेकानंदांच्या शिकागोतील भाषणाबरोबर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांचा दौरा पूर्ण करून शुक्रवारी सकाळी दिल्लीला परतले. त्यांच्या या दौऱ्याबाबत ट्विटरवर त्यांचे सपोर्टर्स आणि विरोधकांमध्ये जणू युद्ध पेटले आहे. #GharAyaPardesi या हॅशटॅगद्वारे विरोधक मोदींच्या या दौऱ्यावर हल्ला करत आहेत. तर समर्थकही #WorldWinnerModiReturns हॅशटॅगने त्यांचे काम आणि यूएस काँग्रेसच्या जॉइंट सेशनमधील त्यांच्या भाषणाचे कौतुक करत आहेत. काहींनी तर त्यांच्या भाषणाची तुलना विवेकानंदांच्या शिकागोतील भाषणाबरोबर केली आहे.

ट्विटरवर ट्रेंडींग ...
- #WorldWinnerModiReturns हॅशटॅगसह 16 हजारपेक्षा जास्त यूझर्सनी ट्विट केले आहे. तर सुमारे 4 हजार यूजर्सनी #GharAyaPardesi सह ट्विट केले आहे.
- दोन वर्षांत मोदींनी सुमारे 40 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
- त्यांच्या सध्याच्या फॉरेन टूर दरम्यान त्यांचे टाइम मॅनेजमेंट पुन्हा एकदा चर्चेत आहे.
- त्यांनी 6 दिवसांची ही ट्रीप सुमारे 140 तासांत पूर्ण केली.
- त्यापैकी 45 तास ते विमानात होते. त्यांनी 33 हजार किमीचा प्रवास केला.

दौऱ्याची चर्चा...
- मोदींच्या या दौऱ्यात सर्वाधिक चर्चा जॉइंट सेशनमध्ये त्यांनी केलेल्या भाषणाची होत आहे.
- मोदी भाषणासाठी आले तेव्हा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये दोन्ही सभागृहांचे एकूण 535 मेंबर्स चार मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवत होते.
- त्यानंतर मोदींनी भाषण सुरू केले. ते सुमारे 48 मिनिटे चालले.
- त्यादरम्यान सुमारे 30 पेक्षा जास्तवेळा टाळ्या वाजल्या.
- 9 वेळा त्यांना स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. तर तीन वेळी अमेरिकेचे खासदार खळखळून हसले.

ट्विटरवर येणारे काही ट्विट्स...
‏@girirajsinghbjp (Giriraj Singh)
A taskmaster setting new benchmark for himself. after taking world by storm he lands in d morning to Utilized the day
‏@indiaaakash (Aakash)
What can be better than this? US leaders taking autograph of PM @narendramodi
‏@roypiya8 (Priyanka Roy)
Your speech was enthralling. You are a true leader. We are so proud of you. Welcome back Sir.
@mohnotgaurav18 (Gaurav Mohnot )
72 claps
9 times standing ovation
‏@uttrashada (UTTRASHADA)
Beyond Ordinary , Great son of MaaBharti,!Welcome home Modi sir, India is proud of u!

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही ट्विट्स...
बातम्या आणखी आहेत...