आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Accused Advocates Set Back From Delhi Gang Rape

दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणी दोन दोषींच्या वकिलांनी घेतली माघार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्यावर्षी 16 डिसेंबर रोजी झालेल्या दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश आणि पवन कुमार गुप्ता यांच्या वकिलांनी माघार घेतल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाला कळवले आहे. दोषींच्या कुटुंबीयांच्या हस्तक्षेपामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


मुकेशचे वकील अ‍ॅड. व्ही.के. आनंद यांनी न्या. रेवा खेत्रपाल आणि न्या. प्रतिभा राणी यांच्यासमोर खटल्यात माघार घेत असल्याचे सांगितले. काही लोक व दोषीच्या कुटुंबातील सदस्य कामात ढवळाढवळ करत असल्यामुळे खटल्यातून
माघार घेत आहे. मुकेशच्या भावाला हा निर्णय कळवला असल्याचे त्यांनी सांगितले.