आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Biggest Democratic Country Friendship Each Other

प्रजासत्ताकदिनी प्रथमच जगातील दोन महान लोकशाहींचे मिलन, महत्त्व कशामुळे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रजासत्ताकदिनी प्रथमच जगातील दोन महान लोकशाहींचे मिलन आज 26 जानेवारी रोजी होत आहे. त्‍यानिमित्‍ताने संपूर्ण जगाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. उभय देशांमध्‍ये होत असलेल्‍या करारांविषयी आणि त्‍यांतील संबधांविषयी सर्वांनाच उत्‍सुकता लागली आहे. या दोन लोकशाहीच्‍या मिलनाचे महत्‍व आज आम्‍ही तुम्‍हाला विषद करणार आहोत.
भारतासाठी
*भारत महाशक्ती आहे हे अमेरिकेला पटले- पाच महिन्यांत झालेली दोन्ही नेत्यांची ही तिसरी भेट म्हणूनच झाली. प्रथमच अमेरिकी राष्ट्रपतींनी दुसऱ्यांदा भारत दौरा केला. भारताशी संबंध वृद्धिंगत करण्यासाठी अमेरिका प्रचंड उत्सुक.
जगासाठी
*जगातील दोन महाशक्ती एकत्र येत आहेत- अमेरिकेतून शस्त्रास्त्रे आयात करणारा भारत सर्वात मोठा देश असल्याने रशिया अगोदरच नाराज. म्हणूनच ४५ वर्षांत प्रथमच रशियन संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तान दौरा केला.
शेजारी देशांसाठी
*दक्षिण आशियात भारताचा दबदबा वाढेल- चीनला चिंता आहे की दोन दशकांपूर्वी अमेरिकेने चीनच्या मदतीने ज्याप्रमाणे सोव्हियत संघाची शकले केली तसे अमेरिका-भारताचे सूत जमू नये. पाकिस्तानात दहशतवाद्यांविरुद्ध पाश आवळले.
अर्थव्यवस्थेसाठी
*गुंतवणुकीसाठी भारत सर्वात भरवशाचा ७२ टक्के अमेरिकी सीईओंना भारतात उद्योग-व्यवसाय करणे सोईचे होईल, अशी आशा. ६० अमेरिकी कंपन्या येत्या तीन-चार वर्षांत 2.51 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करतील.