आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे प्रबळ उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सध्या प्रत्येक माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. मोदींसंबंधी लहान-सहान गोष्टीलाही माध्यमांमध्ये मोठी जागा दिली जाते. एवढेच नाही तर, सोशल नेटवर्किंग साइटवर मोदींच्या कामाची मोठी चर्चा असते. यासाठी मोदी स्वतः लॅपटॉप समोर ठेऊन किंवा त्यांच्या सोबतची मंडळी या सर्व गोष्टी अपडेट ठेवतात असे नाही. तर, यासाठी 100 जणांची टीम मोदींसाठी काम करत असते. हे लोक कायम त्यांच्या सोबत राहून क्षणाक्षणाची घडामोड अपडेट करतात असेही नाही तर, ते मोदी कायम चर्चेत कसे राहातील यासाठी काम करतात.
या टीमचे नेतृत्व मोदींचे दोन विश्वासू लोक करत आहेत. ते त्यांच्या संबंधीच्या प्रत्येक घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यामुळेच मोदी हे ट्विटरवर सर्वाधिक ट्रेंड करणारे भारतीय नेते आहेत. भाजपचा कोणताही कार्यक्रम असला तरीही त्यात चर्चेच्या केंद्रस्थानी मोदीच असतात. मात्र, हे एका रात्रीत झालेले नाही. यामागे मोदींची मोठी प्लॅनिंग होती. त्यांनी जवळपास चार वर्षांपूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणूकांची तयारी सुरु केली आहे. त्याचे परिणाम आता पाहायला मिळत आहेत. मोदींनी इंटरनेटवर आपली प्रचार मोहीम राबवण्यासाठी भारतातील दोन चाणाक्ष लोकांची निवड केली. त्यातील एक आहे राजेश जैन आणि दुसरे आहेत बी.जी. महेश.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.