आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Men Arrested For Fifty three Lakh Stocks In The Old Currency Racket In Delhi

दिल्लीतील त्रेपन्न लाखांच्या जुन्या नोटांप्रकरणी दोन जण अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दोन दिवसांपूर्वी ५३ लाख रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या वाहतूक व्यावसायिकास लुटल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यातील एक हवालदार आणि एका एसपीओला अटक करण्यात आली आहे. या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली असून दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे रुपये लुटून फरार झालेल्या सेक्टर दोनमधील आरोपींचा तपास सुरू आहे. 

अमनगडचे सहायक पोलिस आयुक्त अमन यादव यांनी सांगितले : २८ फेब्रुवारीस दुपारी ४ च्या सुमारास सेक्टर - ३ मधील विनायक अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये  राहणाऱ्या वाहतूक व्यावसायिकाच्या ५३ लाखांच्या जुन्या नोटा लुटून नेण्यात आल्या.  
 
पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवला असून लुटण्यात आलेल्या रकमेपैकी ५० लाख ९३ हजार रुपये त्यांनी  लोधी कॉलनीतील एका फ्लॅटमधून जप्त केले. नवी दिल्ली येथील सागरपूरचे रहिवासी असलेल्या देवेंद्र रावत यांनी २८ फेब्रुवारीस संध्याकाळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यात त्यांनी म्हटले, आपण वाहतूक व्यावसायिक असून एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे. 
बातम्या आणखी आहेत...