आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LOVE JIHAD : Call Details Of Raqibul, Two Ministers Inquiry In Tara Shahdev Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनेक बडया हस्तींशी बोलायचा रकीबुल, कॉल डिटेल्स उघड, राजभवनापर्यंत संबंध!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - झारखंडच्या अल्पसंख्याक विभागाचे मंत्री हाजी हुसेन अन्सारी आणि नगरविकास मंत्री सुरेश पासवान (उजवीकडे)

रांची - राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवच्या फसवणूक प्रकरणानंतर वेगळेच वळण घेतलेल्या रकीबुल प्रकरणात प्रथमच ठोस पुरावा हाती आला आहे. रकीबुलच्या एका मोबाईलचे कॉल डिटेल्स माध्यमांना मिळाले असून त्यात रकीबुलची मंत्री, नेते, आयएएस अधिकारी, न्यायाधीश अशा हायप्रोफाइल लोकांशी अनेकदा चर्चा झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे माजी खासदार इंदर सिंग नामधारी यांच्याशी त्याचे महिनाभरात 26 वेळा बोलणे झाल्याचे समोर आले आहे.

मिडियाला ज्या सिमकार्डचे डिटेल्स मिळाले आहेत, त्याचा क्रमांक 8102777771 हा आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान यावरून 962 इनकमिंग-आउटगोइंग कॉल करण्यात आले आहेत. कोहलीचे संबंध राजभवनापासून, मुख्य सचिवांपर्यंत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. कोहलीकडे एकूण 42 सिमकार्ड सापडली होती. त्यामुळे आता आणखी अनेकांची नावे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेले कॉल डिटेल्स (कोणाशी कितीवेळा बोलणे?)
मो. मुश्ताक अहमद, रजिस्ट्रार व्हिजिलंस, झारखंड हायकोर्ट
8 जुलै ते 20 अगस्त दरम्यान 16 वेळा
सुरजीत कुमार, डीएसपी, नगर उंटारी
6 जुलै ते 6 ऑगस्टदरम्यान 13 वेळा

हाजी हुसेन अन्सारी, झारखंडचे कॅबिनेट मंत्री
29 ते 01 ऑगस्टपर्यंत दोनदा आणि पीएबरोबर 01 ते 09 ऑगस्टदरम्यान सात वेळा

इंद्रदेव मिश्रा (युपी बार काऊंसिलचे सदस्य)
2 जुलै ते 09 ऑगस्टपर्यंत 10 वेळा
तारा शाहदेवच्या मते यांच्या मदतीने युपीच्या अनेक कोर्टांशी रकीबुलचे संबंध
वीणा मिश्रा, न्यायालयीन सेवेत ( देवघर, झारखंड )
5 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत 20 वेळा
या ब्लेयर अपार्टमेंटमध्ये आल्या होत्या असे ताराने सांगितले आहे.
पारितोष उपाध्याय, आइएफएस, संयुक्त सचिव
4 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत 21 वेळा
इंदर सिंह नामधारी, विधानसभेचे माजी सभापती, चतरा येथील माजी खासदार
02 जुलैपासून 06 जुलैपर्यंत तीन वेळा आणि पीएबरोबर 01 जुलै ते 08 ऑगस्टपर्यंत 26 वेळा
सय्यद मतलूब हुसेन, न्यायाधीश
15 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान 2 वेळा
दरम्यान, या प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री हाजी हुसेन अन्सारी आणि नगर विकास मंत्री सुरेश पासवान यांचे मंत्रिपद धोक्यात आहे. या दोन्ही मंत्र्यांना पदावरून हटवण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर दबाव वाढत आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही दोषींविरोधात कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. सुरेश पासवान यांनी रकीबुलशी भेट झाल्याचे मान्य केले आहे.

दरम्यान, जलसंपदा मंत्री अन्नपूर्णा देवींनी मुख्यमंत्र्यांना कारवाईचे स्वातंत्र्य असल्याचे म्हटले आहे. महिला असल्यामुळे तारा शाहदेव यांना न्याय मिळायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झामुमोवर मंत्र्यांना हटवण्यासाटी दबाव वाढत चालला आहे. विशेष म्हणजे रांची पोलिसांनी दोन मंत्र्यांची चौकशी केल्यानेही सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात येत आहे.

चौकशीसाठी परवानगी मागणार
या प्रकरणी मंत्री हाजी हुसेन अन्सारी, सुरेश पासवान आणि इंदर सिंग नामधारी यांची चौकशी होणार आहे. सोमवारी वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रभात कुमार यांनी ही माहिती दिली. या सर्वांची पदे पाहता विधानसभा अध्यक्षांकडे परवानगी मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परवानगी मिळाल्यानंतरच तिघांची चौकशी होईल. प्रभात कुमार यांनी सांगितले की, चौकशीमध्ये रकीबुलने अन्सारी आणि पासवान यांच्याशी नीकटचे संबंध असल्याचे मान्य केले आहे.

दरम्यान, रकीबुलची चौकशी करण्यासाठी पोलिसांना परवानगी मिळाली आहे. पोलिस तीन तारखेला त्याची चौकशी करणार आहेत. यापूर्वीही चौकशीसाठी रकीबुलला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.
पुढे वाचा, मंत्री पासवान रकीबुलला भेटण्याचे कारण