आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two More Attempts For All Categories Of Candidates In UPSC Exam

यूपीएससी परीक्षेसाठी आता वाढीव दोन संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा देणार्‍या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी या वर्षीपासून आणखी दोन वाढीव संधी दिल्या जाणार आहेत. मात्र परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे यूपीएससीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यूपीएससीच्या या निर्णयामुळे देशातील लाखो होतकरू विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
यूपीएससीच्या वाढीव संधीशिवाय परीक्षेच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आला करण्यात आला नसल्याचे यूपीएससीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी जास्तीत जास्त चार संधी देण्यात आल्या असून अन्य मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांसाठी त्यासाठी मर्यादा नाही. भारतीय प्रशासन सेवेतील आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकार्‍यांच्या निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने परीक्षा घेतली जाते.
पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीन स्तरांवर परीक्षा घेतली जाते. यूपीएसईची पूर्वपरीक्षा 24 आॅगस्ट रोजी होणार आहे. 21 वर्षे पूर्ण केलेले व 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेले उमेदवार आवश्यक पात्रतेसह यूपीएससीची परीक्षा देऊ शकतात.
एससी आणि एसटीच्या उमेदवारांना पाच वर्षे वयाची अट शिथिल असून अन्य मागासवर्गीय उमेदवारांसाठी ती तीन वर्षे आहे. ओबीसी वर्गातील उमेदवारांना अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत एकूण सात संधी देण्यात आल्या आहेत. 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 1989 या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्य करणार्‍या उमेदवारांसाठी वयाची अट जास्तीत जास्त पाच वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. लष्करी कारवायांत अपंगत्व आलेल्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.